पुणे - सारथी संस्थेच्या संबंधित असणाऱ्या कुणबी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न येत्या दहा दिवसांत मार्गी लावू, असे आश्वासन बहुजन विकास विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. वडेट्टीवार यांनी पुण्यातील सारखी कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सारथीच्या कामकाजाविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
'सारथी'चे सर्व प्रश्न दहा दिवसात निकाली काढू, वडेट्टीवारांचे आश्वासन - सारखी संस्था
बहुजन विकास विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुण्यातील सारथी कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सारथीच्या कामकाजाविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तसेच संस्थेसंदर्भातील प्रश्न जाणून घेतले.
यूपीएससी विद्यार्थ्यांचा विषय दोन दिवसात निकाली काढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इतर विद्यार्थ्यांचे यासंदर्भातील सर्व प्रश्न पुढील दहा दिवसांत मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी वडेट्टीवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देत, फडणवीस हे सुसंस्कृत राजकारणी असल्याचे म्हटले. त्यांच्याकडून कदाचित अनवधानाने भाष्य झाले असावे, अशी शंका उपस्थित केली. तसेच फडणवीस यांनी प्रतिज्ञापत्रात काही माहिती लपवली असल्यास यासंबंधी न्यायालयात सत्य बाहेर येईल, असा विश्वास देखील वडेट्टीवारांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणात फडणवीस सरकारच्या काळात 15 मंत्र्यांना क्लीन चिट देण्यात आली होती. परंतु, आरोप झालेल्यांनी चौकशीला सामोरे जावे, यानंतरच सत्य बाहेर येईल असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.