महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, ९६३ नवे रुग्ण - कोरोना पुणे

आज (शनिवार) दिवसभरात पुणे शहरात ९६३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे.

Number of corona patients increases in Pune
पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

By

Published : Mar 6, 2021, 7:20 PM IST

पुणे - पुणे शहरात कोरोनाचा पुन्हा फैलाव होण्याची चिन्ह आहेत. दिवसाला ९०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. आज (शनिवार) दिवसभरात पुणे शहरात ९६३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येवर नजर टाकली तर गेल्या २ आठवड्यापासून नव्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

शुक्रवारी ५ मार्चला ८३० नवे रुग्ण शहरात आढळून आले होते. तर ४ मार्चला ९०४ रुग्ण, ३ मार्चला ८५३ रुग्ण, २ मार्चला ६८८ नवे रुग्ण शहरात आढळून आले आहेत.

३२१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू-

आज (शनिवार) ६ मार्चला दिवसभरात ६५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर ९ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये ५ रूग्ण पुण्याबाहेरील होते. सध्या शहरात ३२१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २ लाख ७ हजार ३४६ इतकी झाली आहे. तर सध्या पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ६४६० इतकी आहे. आजपर्यंत पुणे शहरात एकूण ४८८५ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर आजपर्यंतच एकूण १ लाख ९६ हजार १ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

हेही वाचा-'सर्वांच्या सहकार्यामुळे कोरोनाची दुसरी लाट आपण थोपवू शकतो'

ABOUT THE AUTHOR

...view details