पुणे -विभागातल्या सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर या चार जिल्ह्यात अद्याप कोरोना विषाणू बाधित एकही रुग्ण आढळलेला नाही, असे स्पष्टीकरण पुणे विभागाचे आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिले आहे. या चार जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 242 शाळांची तपासणी करण्यात आली असून यातल्या 38 नागरिकांना 14 दिवसांच्या निरिक्षणाखाली ठेवल्यानंतर त्यांना परत पाठवण्यात आले आहे. 204 नागरीक अजून निरिक्षणाखाली आहेत. मात्र, एकही पॉझिटिव्ह रुग्ण या चार जिल्ह्यात आढळला नसल्याचे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले आहे.
सातारा, सांगली, कोल्हापूरसह अहमदनगर जिल्ह्यात २०४ नागरिक निरिक्षणाखाली, एकही नाही कोरोना बाधित
पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर या चार जिल्ह्यात अद्याप कोरोना विषाणू बाधित एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र या जिल्ह्यातील नागरीक अजून निरीक्षणाखाली आहेत.
सातारा, सांगली, कोल्हापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात २०४ नागरिक नरीक्षणाखाली, एक ही जण कोरोना बाधित नाही
पुणे शहराचा विचार केला तर गेल्या चोवीस तासात 28 नागरिकांचे सॅम्पल घेण्यात आले होते. यातले 27 सॅम्पल निगेटिव्ह आले आहेत. केवळ एक जण पॉझिटिव्ह असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले असून प्रशासनाकडून वेगवेगळ्या माध्यमातून उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.