महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shamburaj Desai : उद्धव ठाकरे यांच्याकडून 'ही' अपेक्षा नव्हती - शंभूराज देसाई - शंभुराज देसाई

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांची सभा झाली त्यात त्यांनी आमच्यावर केलेली टीका आम्ही समजू शकतो.पण मुख्यमंत्री, त्याच्या नातववरची टीका खालच्या दर्जाची होती. पण आजपर्यंत अनेक टीका पाहिल्या पण अशा टीका कुठे ऐकल्या नव्हत्या,उद्धव ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अस यावेळी देसाई म्हणाले. पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने देसाई आले होते.यावेळी ते बोलत होते.

Shamburaje Desai :
शंभुराजे देसाई

By

Published : Oct 9, 2022, 6:07 PM IST

पुणे :राज्याच्या राजकारणात गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदे गट- ठाकरे गट असे दोन गट शिवसेनेत झाले आहेत.या दोन्ही गटात दारोरोज आरोप प्रत्यारोप होत असून यांच्यात मोठा दुरावा निर्माण झाला आहे. नुकताच दोन्ही गटांचा दसरा मेळावा पार पडला. त्यात दोन्ही गटांनी एकमेकांवर चांगलीच आगपाखड केली. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर टिका केली. यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री तसेच त्यांचा मुलगा, मुख्यमंत्र्यांचं नातू यावर टिका केली. यावर शिंदे गटाचे आमदार, राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी आपल मत व्यक्त केलं आहे.

शंभुराज देसाई

ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची सभा झाली त्यात त्यांनी आमच्यावर केलेली टीका आम्ही समजू शकतो.पण मुख्यमंत्री आणि त्याच्या नातव वरची टीका खालच्या दर्जाची,प ण आजपर्यंत अनेक टीका पाहिल्या पण अशा टीका कुठे ऐकल्या नव्हत्या. उद्धव ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यामुळं आम्ही दुखावलो गेलो आहे. असे अनेकजण दुखावले आहेत.अनेकजण यात नाराज होऊन निषेध करत आहेत. अस यावेळी देसाई म्हणाले. पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने देसाई आले होते.यावेळी ते बोलत होते.

शिंदे साहेबांसोबत -शिंदे, ठाकरे यांच्यातील निवडणूक आयोगाकडे असलेल्या लढाई बाबत देसाई यांना विचारलं असता ते म्हणाले की कोर्टामध्ये काय दाखल झाला मला माहिती नाही. मी या सर्व घडामोडीमध्ये शिंदे साहेबांसोबत आहे. त्यावर सर्व पदाधिकारी यांनी आमचे नेते म्हणून एकनाथ शिंदे याना नेते केले आहेत. शिवसेना सोडली नाही आम्ही नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना निवडले आहेत.अस यावेळी देसाई म्हणाले. तसेच 100 दिवस झाले आमचे उद्धव साहेब यांची तुम्हीच ठरवा. मी उद्धव साहेब यांच्या मंत्रिमंडळ नामदारी होतो. आता चांगलं काम चाललं आहे. अनेक निर्णय केले आहेत. मुख्यमंत्री 18 तास काम करत आहेत, सगळे मंत्री झटून काम करत आहेत. अस देखील यावेळी देसाई म्हणाले.

सामना म्हणजे महाराष्ट्र का ?आम्ही महाविकास आघाडीमध्ये पक्ष आदेश म्हणून राहिलो.आदेश म्हणून राहिलो,अडीच वर्षे सरकार चाकवताना कळलं की हे सरकर राष्ट्रवादी चालवत आहे.सामना म्हणजे महाराष्ट्र का ? सोशल मिडिया कोणाला तरी डॅमेज करण्यासाठी असतात.भाजपची स्क्रिप्ट नव्हती. कोणी काहीही बोलत.मुख्यमंत्री दसरा मेळावामध्ये त्याने वेगळे भाषण केले विकासाच बोलले.अस देखील यावेळी देसाई म्हणाले. मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर हे उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकून अस्वस्थ झाले यावर देसाई यांना विचारला असता ते म्हणाले की मी अस्वस्थ नाही. कुटूंबासोबत आहे.केसरकर यांना मेळाव्यातील ताण असेल,मेळाव्याला उद्धव ठाकरे याच्यापेक्षा जास्त गर्दी होती म्हणून केसरकर शिर्डीला गेले असतील.अस देखील यावेळी देसाई म्हणाले.

आदित्यच लग्न लवकर झालं पाहिजे -वेदांत एवढाच मोठा प्रकल्प दिला जाईल. अस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वसन दिल आहे. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर देसाई म्हणाले की वास्तविक पाहता गुन्हा दाखल होण्यासारखी वक्तव्य केले आहे.उद्धव ठाकरे याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.पण आम्ही गुन्हा दाखल करण्यावर विचार केलेला नाही.अस देखील यावेळी देसाई म्हणाले. तसेच आदित्यच लग्न लवकर झालं पाहिजे.त्यांना पण नातू होईल.त्याचे लाडू खायला आवडेल पण उद्धव ठाकरे यांच्या नातूला जर अस काही वक्तव्य केलेलं त्यांना आवडेल का ? शिवसैनिक आपआपल्या स्तरावर जाऊन आता उद्धव ठाकरे याच्यावर टीका करत आहेत.सामान्य शिवसैनिक नाराज आहे.म्हणून त्या टीका करत आहेत.अस देखील यावेळी देसाई म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details