महाराष्ट्र

maharashtra

पुण्यात लसीचा तुटवडा नाही - महापौर मुरलीधर मोहोळ

By

Published : Mar 10, 2021, 5:06 PM IST

केंद्र शासनाच्या नियमानुसार प्रत्येक केंद्रावर दररोज शंभर डोस दिले जाणे आवश्यक आहे. त्यानुसारच, प्रत्येक केंद्रावर 100 डोस दिले जात आहेत. पुढच्या दोन ते तीन दिवसांचा साठादेखील महापालिकेकडे उपलब्ध असून तिथून पुढचा साठा लवकरच राज्य शासनाकडून मिळणार आहे. कुठेही लसीकरणाचा तुटवडा नसून नियमितपणे शहरात लसीकरण सुरू आहे, असे महापौर मोहोळ म्हणाले.

Pune Mayor Muralidhar Mohol News
पुणे महापौर मुरलीधर मोहोळ न्यूज

पुणे -शहरात कोणत्याही प्रकारे कोरोना लसीचा तुटवडा झाला नसून केंद्र शासनाच्या नियमांनुसारच शहरातील 77 केंद्रावर दररोज 100 लोकांप्रमाणे लस देण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीची महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे कमतरता निर्माण झाली आहे, हे वृत्त चुकीचे असून शहरात लसीचा तुटवडा निर्माण झालेला नाही, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे महापौर मुरलीधर मोहोळ न्यूज
आत्तापर्यंत 1 लाखाहून अधिक जणांनी घेतली लस

राज्यात 16 जानेवारीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरणाला प्रारंभ झाला. तेव्हापासून पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत शहरात 1 लाखाहून अधिक जणांनी लस घेतली आहे. महापालिकेला राज्य शासनाकडून लसीकरणासाठी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यासाठी तसेच, तिसऱ्या टप्प्यातील जेष्ठ नागरिक व अन्य आजारांच्या व्यक्तींच्या लसीकरणासाठी आजपर्यंत दोन लाख 22 हजार आठशे लसींचे डोस उपलब्ध झाले आहेत. जानेवारीपासून कमला नेहरू रूग्णालयात सुरू झालेल्या लसीकरणाची व्याप्ती वाढून 44 शासकीय लसीकरण केंद्रांसह 33 खासगी रुग्णालयांतील केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. अशी माहिती यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

केंद्राच्या नियमानुसार देण्यात येत आहे लस

केंद्र शासनाच्या नियमानुसार प्रत्येक केंद्रावर दररोज शंभर डोस दिले जाणे आवश्यक आहे. त्यानुसारच, प्रत्येक केंद्रावर 100 डोस दिले जात आहेत. पुढच्या दोन ते तीन दिवसांचा साठादेखील महापालिकेकडे उपलब्ध असून तिथून पुढचा साठा लवकरच राज्य शासनाकडून मिळणार आहे. कुठेही लसीकरणाचा तुटवडा नसून नियमितपणे शहरात लसीकरण सुरू आहे, असेही मोहोळ या वेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details