पुणे - महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन या पुण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांना राजनाथ सिंह यांनी राफेलची पूजा केल्याबाबत विचारले असता, त्यांनी त्यांच्या कृतीचे समर्थन केले आहे. तसेच राफेलची पुजा करताना लिंबु मिरची चढवली तर त्यात चूक काय? ही अंधश्रद्धा नाही तर आमची श्रद्धा आहे, असे सांगत अर्थमंत्री सीतारामन यांनी सिंह यांच्या राफेल पूजेचे आणि लिंबू-मिरची ठेवण्याच्या कृतीचे समर्थन केले.
निर्मला सीतारामन यांची पत्रकार परिषद पुणे पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देत असताना, तसेच आपल्या कृतीचे समर्थन करत असताना सीतारामन यांनी यापूर्वी देखील तत्कालीन संरक्षण मंत्र्यांनी त्यांच्या धार्मिक परंपरेनुसार पूजन केले होते, याची आठवण करून दिली. मात्र त्यावेळी कोणीच चर्चा केली नाही, मग आत्ताच ही चर्चा का? असा सवाल देखील उपस्थित केला.
हेही वाचा... नोबेल २०१९ : इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद अली यांना शांततेचे नोबेल
महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या कामाचा आढावा घेतला. मागील 5 वर्षांत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व घटकांसाठी काम केले आहे. विशेष करून पाण्याच्या विषयात मोठे काम आहे. शेती तसेच शहरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात सरकारला यश आले आहे. अजूनही काही कामे बाकी आहेत पण भाजप ते पूर्णत्वाला नेईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
हेही वाचा... 'मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला लुटले, आमचा लढा फडणविसांविरोधातच'
पंजाब महाराष्ट्र बँकेसंदर्भात रिजर्व बँकेच्या गव्हर्नसोबत बोलणे झाले आहे. तसेच ठरलेल्या प्रक्रियेनुसार योग्य ती कार्यवाही होईल. मात्र ग्राहकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा, अशी विनंती आपण केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच पुरग्रस्त कोल्हापूर, सांगलीसाठी आर्थिक मदत देण्याबाबत निकष ठरलेले आहे. त्यानुसार नुकसानधारकांना मदत उपलब्ध होईल त्यात कोणी राजकारण करण्याची आवश्यकता नाही, असे सीतारामन यावेळी म्हणाल्या आहेत. मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकांमधील गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी, त्या संदर्भातील कायद्यात सुधारणा आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.