पुणे- मागील काही दिवसांपासून पुण्यासह राज्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. पुढचे सहा दिवस पुण्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे शहरात शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कमी प्रमाणात पाऊस पडला. रविवारी देखील तीच स्थिती होती. मात्र दुपारनंतर पुणे शहरासह उपनगरात दुपारनंतर पावसाच्या मध्यम सरी पडल्या. त्यानंतर आता येत्या आठवडाभर शहर आणि परिसरात मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
पुढील आठवडाभर पुण्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज - हवामान विभाग
पुढचे सहा दिवस पुण्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे शहरात शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कमी प्रमाणात पाऊस पडला. रविवारी देखील तीच स्थिती होती. मात्र दुपारनंतर पुणे शहरासह उपनगरात दुपारनंतर पावसाच्या मध्यम सरी पडल्या. त्यानंतर आता येत्या आठवडाभर शहर आणि परिसरात मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
दरम्यान दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टी ते उत्तर केरळ किनारपट्टी पर्यंत असलेली द्रोणीय क्षेत्र कायम आहे. त्यामुळे कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यतादेखील हवामान विभागाने वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्रात देखील पुढील चार दिवस काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाटी भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय मराठवाड्यात देखील काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात मात्र काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.