पुणे - शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या (Corona Cases Hike in Pune) रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी पुणे महापालिका क्षेत्रात 8301 नव्या रुग्णांची नोंद (Today New Corona Cases) करण्यात आली आहे. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 5480 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे शहरात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 45081 इतकी झाली आहे.
Pune Corona Update : पुण्यात शुक्रवारी 8301 नवे कोरोनाबाधित; 4 जणांचा मृत्यू - आजची पुणे कोरोना आकडेवारी
शुक्रवारी पुणे महापालिका क्षेत्रात 8301 नव्या रुग्णांची नोंद (Today New Corona Cases) करण्यात आली आहे. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 5480 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
कोरोना फाईल फोटो
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात एकूण 20338 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. पुण्यामध्ये सक्रिय रुग्णसंख्येच्या तुलनेत 3.19 टक्के रुग्णसंख्या रुग्णालयात उपचार घेत आहे.
- मुंबईत शुक्रवारी ५००८ नव्या रुग्णांची नोंद -
मुंबईत आज (२१ जानेवारी) ५००८ नवे रुग्ण (Mumbai New Corona Cases) आढळून आले आहेत. तर १२ मृत्यूची (Corona Death) नोंद झाली आहे. आज १२,९१३ रुग्णांना डिस्चार्ज (Patients Discharged) देण्यात आला आहे.