महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Actress Argument on Road in Pune : नवोदित अभिनेत्रीचा भररस्त्यात राडा; नागरिकांना शिवीगाळ करून पोलिसाच्या बोटाला घेतला चावा - Chandannagar Police station

पुण्यात सरकारी कामात अडथळा आणणे तसेच महिला पोलिसाच्या बोटाला चावा घेतल्या प्रकरणी संबंधीत नवोदित अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी काकुली बिश्वास (वय 28, सध्या रा. अंधेरी, मुंबई, मूळ रा. बंगळुरू) हिला अटक करण्यात आली. याबाबत महिला पोलीस शिपाई परवीन शेख यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद ( Chandannagar Police station ) दिली आहे. त्यानुसार काकुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Actress Argument on Road in Pune )

Actress Kakuli
नवोदित अभिनेत्रीचा भररस्त्यात राडा

By

Published : Jul 2, 2022, 7:54 PM IST

पुणे - पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईहून पुण्यात आलेल्या एका नवोदित अभिनेत्रीने हॉटेलचालकाशी वाद झाल्याने भरस्त्यात नागरिकांना शिवीगाळ करून राडा घातल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. दरम्यान यावेळी तिला समजावून सांगणार्‍या महिला पोलिसाच्या बोटाला देखील तिने चावा घेतला आहे. ( Actress Argument on Road in Pune )

काकुलीवर गुन्हा दाखल - यावेळी सरकारी कामात अडथळा आणणे तसेच महिला पोलिसाच्या बोटाला चावा घेतल्या प्रकरणी संबंधीत नवोदित अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी काकुली बिश्वास (वय 28, सध्या रा. अंधेरी, मुंबई, मूळ रा. बंगळुरू) हिला अटक करण्यात आली. याबाबत महिला पोलीस शिपाई परवीन शेख यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात ( Chandannagar Police station ) फिर्याद दिली आहे. त्यानुसार काकुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेल व्यवस्थापकाचा पैसे देण्यास नकार -काकुली नवोदित अभिनेत्री ( Actress Kakuli ) आहे. तिने काही वेबसिरीजमध्ये छोट्या भूमिका केली आहे. ती कामाच्या शोधात असून ती पुण्यात कामानिमित्त आली होती. तिने वडगाव शेरी परिसरातील एक हॉटेलमधील खोली ऑनलाइन बुक केली होती. हॉटेल मधील खोली सुविधा तिला आवडली नाही, म्हणून तिने बुकिंग केलेले पैसे परत मागितले. त्यावेळी हॉटेल व्यवस्थापनाने पैसे परत देण्यास नकार दिला.


पोलिसाच्या बोटाला घेतला चावा -या कारणावरुन तिने हॉटेलमधील कर्मचार्‍यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती हॉटेल व्यवस्थापनाने पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन केलेल्या दामिनी पथकातील महिला पोलीस तेथे गेल्या. त्यांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.मात्र ती एकण्याच्या मनस्थितीत नव्हती. हॉटेलसमोरील रस्त्यावर गोंधळ घालणार्‍या काकुलीला महिला पोलिसांनी गाडीत बसण्यास सांगितले. त्या वेळी दामिनी पथकातील पोलीस कर्मचारी परवीन शेख यांच्या बोटाचा चावा घेतला. सरकारी कामात आणणे तसेच दुखापत केल्या प्रकरणी तिला अटक करणात आली आहे.

हेही वाचा -Sharad Pawar : 'महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्तीचा राजकारणाशी...'; शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं

ABOUT THE AUTHOR

...view details