महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'कोरोनासोबतच रुग्णांवर एकटेपणाचा दबाव, संवाद आणि सकारात्मक विचारांची गरज' - मानसोपचार तज्ज्ञ ऑन कोरोना

इतर बाबीचा अजिबात विचार न करता आजारावर लक्ष केंद्रित करत हा आजार बरा होणारा आहे. योग्य उपचार आणि सकारात्मक विचार करत आजाराशी लढा द्यायचा ही गाठ मनाशी घट्ट बांधली पाहिजे, असे मत मानसोपचार तज्ज्ञ तसेच समुपदेशक सांगतात.

pune corona
कोरोना

By

Published : Sep 7, 2020, 8:11 PM IST

पुणे - शहर आणि राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोना झालेल्या रुग्णाला कोरोना आजारासोबतच आणखी एका समस्येशी लढावे लागत आहे, आणि ही समस्या म्हणजे 'एकटेपणा'. सामाजिक बहिष्काराची भावना आजारामुळे इतरांपासून आपण वेगळे पडलो असल्याची भावना या रुग्णांमध्ये बळावते. सोबतच आपण आजारी असताना सोबत कोणी नसल्याने एकीकडे एकटेपणा तर शिवाय आपल्या कुटूंबाला बाहेर काय सोसावे लागत असेल या चिंतेने रुग्णांना अधिकच ग्रासले जाते. त्यामुळे आजारासोबतच या मानसिक तणावाशी रुग्णाला लढावे लागत असल्याचे दिसून आले आहे.

मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशक

अशा परिस्थितीत इतर बाबीचा अजिबात विचार न करता आजारावर लक्ष केंद्रित करत हा आजार बरा होणारा आहे. योग्य उपचार आणि सकारात्मक विचार करत आजाराशी लढा द्यायचा ही गाठ मनाशी घट्ट बांधली पाहिजे, असे मत मानसोपचार तज्ज्ञ तसेच समुपदेशक सांगतात.

दरम्यान, या काळात येणारा एकटेपणा हा रुग्णाचे खच्चीकरण करत असतो आणि त्यातून नैराश्य रुग्णामध्ये येत असते. त्यामुळे रुग्णांनी सतत आपल्या आप्त स्वकीयांशी बोलले पाहिजे. फोनच्या माध्यमातून, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलत राहिल्याने मनावरील ताण कमी होतो. एकटेपणाची भावना कमी होते. यासोबतच ध्यान-धारण, सहज करता येणारे योगासन, व्यायाम करत राहावे, असे समुपदेशक सांगतात. सतत सकारात्मक विचार करत राहणे महत्वाचे असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात.

ABOUT THE AUTHOR

...view details