पुणे:घरगुती वापराच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात पुन्हा एकदा ५० (Gas cylinder price hike) रुपयांची वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरसाठी १,०५३ रुपये मोजावे लागणार आहे. सातत्याने होत असलेल्या गॅस दरवाढीच्या विरोधात आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (Nationalist Women Congress movement) वतीने, टिळक चौकात भर पावसात आमदार शहाजी बापू पाटील यांचा डायलॉग मारत महिलांनी निषेध (Movement against gas price hike) व्यक्त केला. काय ते सिलेंडर..काय ती महागाई..काय ते सरकार..सगळ नॉट ओके आहे..अश्या घोषणाबाजी करत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने गॅस दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
Gas cylinder price hike: नॉट ओके म्हणत गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन - Nationalist Women Congress movement
घरगुती वापराच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात (Movement against gas price hike) पुन्हा एकदा ५० रुपयांची वाढ. सातत्याने होत असलेल्या गॅस दरवाढीच्या (Gas cylinder price hike) विरोधात 'काय ते सिलेंडर..काय ती महागाई..काय ते सरकार..सगळ नॉट ओके आहे'..अश्या घोषणाबाजी करत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (Nationalist Women Congress movement) वतीने गॅस दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गॅसच्या किंमती मध्ये वाढ होताना दिसत आहे.आधी गॅसची किंमत १,००३ रुपये होती.आत्ता १०५० रुपये म्हणजेच ५० रुपये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मागील ४८ दिवसांतील ही दुसरी दरवाढ ठरली आहे. या दरवाढीने अगोदरच महागाईने हैराण झालेल्या सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. जे अच्छे दिनाचे स्वप्न मोदी सरकारने दाखवले होते.त्या अच्छे दिनाचा काय? असा सवाल करत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.
हेही वाचा:Petrol Diesel Rates : औरंगाबादेत डिझेल ३ तर पेट्रोल २ रुपयांनी महागले.. पहा आजचे राज्यभरातील दर