पुणे - केंद्रातील भाजप सरकारने 2019 पासून ते 2021 पर्यंत कोरोनाच्या या काळात ज्या काही सुरक्षित व्यवस्था तयार करायला पाहिजे होती, ते केले गेले नाही. लसीकरणात देखील दलाली करण्याचे काम करण्यात आले. कोरोनाच्या या काळात आज देशात मोठ्या प्रमाणात लोक मृत्युमुखी पडलेले असतानाही भाजपकडून शुक्रवारी सेलिब्रेशन करण्यात आले. ऑल इझ वेल असं देशाचे पंतप्रधान संबोधित करत असतील. तर याच्यापेक्षा दुर्भाग्य कोणतंही नाही. लोकांच्या मृत्यूवर तांडव करणं आणि त्याचा उत्सव साजरा करणे यापेक्षा दुर्भाग्य कोणतंही नाही. महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे आज आमच्या मुळावर रुजले गेलेले आहे. देश 50 वर्षे मागे गेलेला आहे. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप सरकारवर केली आहे.
हे ही वाचा -अमरिंदर सिंग यांच्या मैत्रिणीवरून पंजाबमध्ये घमासान; कोण आहे अरुसा आलम?
भाजपला सत्तेची गुर्मी -
जे 21 हजार कोटीचे ड्रग्स मिळालं आहे. त्यात खरंतर नियमाप्रमाणे ज्याचं पोर्ट आहे. जो मालक आहे. त्याच्यावर कायदेशीरपणे कारवाई करण्यात यायला हवी होती. देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग येणे यात कोणाचे साठेलोटे आहे. कोण त्याचा पार्टनर आहे. कोण त्याच्या पाठीशी आहे. एवढं मोठं ड्रग या देशात येत आहे आणि या देशातील तरुणांना या ड्रगमध्ये बुडवण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप आणि मूठभर उद्योगपतींचा सुरू आहे. भाजपने आर्यनच्या प्रकरणात हिंदू आणि मुस्लिम वाद करण्याचा जो प्रयत्न केला आहे. तो चेहरा आत्ता सर्वांना माहीत झालेला आहे. देशात आत्ता पोटाची लढाई सुरू आहे. सत्तेची जी गुर्मी भाजपला आली आहे, ती गुर्मी आत्ता जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही, असं देखील यावेळी पटोले म्हणाले.
हे ही वाचा -जणू काही संपूर्ण जगातील अमली पदार्थ केवळ महाराष्ट्रातच - उद्धव ठाकरे
देशाला 7 ते 8 वर्ष मागे घेऊन गेले, त्याचा हिशोब द्या -
आज देशातील जे मूळ प्रश्न आहे. त्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचे काम भाजप करत आहे. कधी सावरकर आणतील तर कधी सरदार वल्लभभाई पटेल तयार होतात. देशातील इतिहास हा सर्वांना माहीत आहे. कोण स्वतंत्र्यवीर आहे की नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. आज हे प्रश्न देशासमोर नाहीत. या देशाला 7 ते 8 वर्ष मागे घेऊन गेले आहे, त्याचा हिशोब द्या.असे देखील यावेळी पटोले म्हणाले.