पुणे- सिरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड तयार करत असलेली कोरोनावरची लस यायला अजून 6 महिने लागतील, असे आदर पूनावाला यांनी स्पष्ट केले. आम्ही कुठलीही घाई न करता सर्व चाचण्या घेऊन योग्य वेळी लस आणू असे, आदर पूनावाला म्हणाले. पुण्यातील माय लॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स कंपनीने ऑटोमॅटिक मोलक्युलर डायगनोस्टिक करू शकणाऱ्या मशीनची निर्मिती केली आहे. मंगळवारी पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये या कीटचे उद्घाटन करण्यात आले. सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला आणि आदर पूनावाला यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
फास्ट टेस्टिंगसाठी पुण्यातील माय लॅबने तयार केले मशीन; 'ऑक्सफर्डची लस यायला लागणार 6 महिने' - ऑक्सफर्डची लस यायला लागणार काही महिने
माय लॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स कंपनीने ऑटोमॅटिक मोलक्युलर डायगनोस्टिक करू शकणाऱ्या मशीनची निर्मिती केली आहे. मंगळवारी पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये या किटचे उद्घाटन करण्यात आले. हे मशीन एकाच वेळी अनेक सॅम्पल्सची चाचणी करू शकते. या मशीनद्वारे कोरोनासंबंधित स्वॅब, प्लाझ्मा, टिशू सॅम्पल्सच्या चाचण्या रॅपिड पद्धतीने करता येणार आहेत. या मशीनमुळे मोठी जागा, लॅब, 4, 5 तंत्रज्ञ याची गरज भासणार नाही, असे कंपनीने जाहीर केले आहे.
कॉम्पॅक्ट एक्स एल असे या मशीनला नाव देण्यात आले आहे. माय लॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सने कॉम्पॅक्ट एक्स एल अर्थात लॅब इन बॉक्स हे आधुनिक मशीन तयार केले आहे. हे मशीन एकाच वेळी अनेक सॅम्पल्सची चाचणी करू शकते. या मशीनद्वारे कोरोनासंबंधित स्वॅब, प्लाझ्मा, टिशू सॅम्पल्सच्या चाचण्या रॅपिड पद्धतीने करता येणार आहेत. या मशीनमुळे मोठी जागा, लॅब, 4, 5 तंत्रज्ञ याची गरज भासणार नाही, असे कंपनीने जाहीर केले आहे. या मशीनचे उद्घाटन सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला आणि सीईओ आदर पूनावाला यांनी केले. यावेळी माय लॅबचे प्रमुख हसमुख रावळ उपस्थित होते.
यावेळी बोलताना सायरस पूनावाला यांनी भारतीय तरुण उद्योजक या क्षेत्रात पुढे येत असल्याचा आनंद होत असल्याचे सांगितले. तसेच टेस्टिंगमध्ये अशा प्रकारचे जगातील हे एक महत्वाचे संशोधन असल्याने त्याचा अधिक आनंद आहे. टेस्टिंगवर भर दिल्याशिवाय पर्याय नाही. अधिकाधिक टेस्टिंग होणे गरजेचे आहे. टेस्टिंग वेगाने होत नसल्याने काय होत आहे, हे आपण बजाज कंपनीत मोठ्या प्रमाणात कर्मचारी पॉझिटिव्ह सापडल्याचे पाहिले. त्यामुळे अधिक तपासणी वेगात होण्यात या मशीनमुळे फायदा होईल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर माय लॅबचे रावळ यांनी सेक इन इंडिया अंतर्गत हे महत्वाचे पाऊल असल्याचे सांगितले. आदर पूनावाला यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि अद्यावत संशोधन हे कोरोना विषयक लढ्यात महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे सांगितले. सिरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड तयार करत असलेली कोरोनावरची लस यायला अजून 6 महिने लागतील असेही आदर पूनावाला यांनी स्पष्ट केले.