महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रमजान महिन्यात मुस्लीम समाजाने सरकारला सहकार्य करावे - मौलाना शबी अहसन काझमी

येत्या बुधवारपासून मुस्लीम समाजाचे पवित्र अशा रमजान महिन्याला सुरूवात होत आहे. वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्य सरकार जे काही निर्णय घेईल त्याला मुस्लिम समाजातील लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शिया मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलाना शबी अहसन काझमी यांनी केले आहे.

Muslim community should cooperate with the government during the month of Ramzaan
Muslim community should cooperate with the government during the month of Ramzaan

By

Published : Apr 11, 2021, 3:03 PM IST

Updated : Apr 11, 2021, 9:12 PM IST

पुणे - राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. पुन्हा राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याची तयारी राज्य सरकारच्यावतीने केली जात आहे. येत्या बुधवारपासून मुस्लीम समाजाचे पवित्र अशा रमजान महिन्याला सुरूवात होत आहे. वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्य सरकार जे काही निर्णय घेईल त्याला मुस्लिम समाजातील लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शिया मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलाना शबी अहसन काझमी यांनी केले आहे.

रमजान महिन्यात मुस्लीम समाजाने सरकारला सहकार्य करावे
लॉकडाऊन केलं तर सर्वसामान्यांचा विचार करावा -
मागच्या वर्षी अचानक लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसला आणि अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. येत्या बुधवारपासून सुरू होणाऱ्या पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम धर्मियांच्यावतीने एक महिना उपवास (रोजा) केला जातो. वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्य सरकार लॉकडाऊन लावण्याच्या प्रयत्नात आहे. असे असताना सरकारने मागच्या लॉकडाऊन सारखे अचानकपणे लॉकडाऊन लावू नये. लॉकडाऊन लावताना सर्वसामान्य नागरिक तसेच गोरगरीब कष्टकरी नागरिकांचा विचार सरकारने करावा, असे आवाहन देखील मौलाना यांनी सरकारला केले आहे.
लोकांनीही सरकारला सहकार्य करावे -
पवित्र रमजान महिना हा येत्या बुधवारपासून सुरू होत आहे. हा महिना पवित्र महिना म्हणून समजला जातो. यात दिवसभर उपवास करून परमेश्वर म्हणजेच अल्लाची पूजा (ईबादत) केली जाते. म्हणून सर्व मुस्लिमधर्मीय नागरिकांनी या महिन्यात ईबादत करावी आणि विनाकारण बाहेर फिरु नये. आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता द्यावी. सरकार जे काही निर्णय घेईल त्याला सर्वांनी सहकार्य करावे, असं देखील यावेळी मौलाना यांनी सांगितले.
Last Updated : Apr 11, 2021, 9:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details