महाराष्ट्र

maharashtra

पुणेकरांना महापालिकेच्या करांमध्ये १५ टक्के सवलत - मुरलीधर मोहोळ

By

Published : Feb 19, 2021, 3:03 PM IST

पुणे महापालिकेच्या करांमध्ये 15 टक्के सवलत देण्यात आली आहे. ही योजना १ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ दरम्यानच्या कालावधीत लागू होणार आहे.

Murlidhar Mohol said that Pune residents have been given 15 per cent relief in municipal taxes
पुणेकरांना महापालिकेच्या करांमध्ये १५ टक्के सवलत - मुरलीधर मोहोळ

पुणे - शहरातील नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. महापालिकेनेकोरोना काळात ज्या नागरिकांनी १ एप्रिल २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या काळात केवळ ज्या निवासी मिळकत धारकांनी संपूर्ण मिळकत कर भरला आहे अशा निवासी मिळकत धारकांना २०२१-२२ च्या बिलांमध्ये शासनाचे कर वगळून सर्व करांमध्ये १५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या पुणेकरांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून असल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

जे नागरिक संपूर्ण मिळकतकर १ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ दरम्यानच्या कालावधीत कर भरतील त्यांना ही सवलत लागू होणार आहे, असे महापौरांनी सांगितले. या योजनेत महानगरपालिकेच्या सर्व साधारण कर, सफाई पट्टी, वृक्ष कर, रस्ता कर, जलनिस्सारण कर, मलनिस्सारण कर, अग्निशमन कर, शिक्षण उपकर आणि विशेष सफाई कर करांचा समावेश आहे. या योजनेचा फायदा पुणेकरांनी घ्यावा असे आवाहन महापौरांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details