महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 19, 2021, 8:53 PM IST

ETV Bharat / city

पैशाच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची मानेवर फॅनचा हुक घालून हत्या

पुणे - शहरातील हडपसर परिसरात लहान भावाचा मोठ्या भावाने मानेमध्ये फॅनचे हुक घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे शहरात सोमवारी रात्री एकाच वेळी दोन ठिकाणी दोन तरुणाच्या खूनाचा प्रकार उघडकीस आला आहे.

Murder pune
Murder pune

पुणे - शहरातील हडपसर परिसरात लहान भावाचा मोठ्या भावाने मानेवर फॅनचे हुक घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे शहरात सोमवारी रात्री एकाच वेळी दोन ठिकाणी दोन तरुणाच्या खूनाचा प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर येथील सोलापूर रोडवरील चौकात एका रिक्षाचालकाच्या गळ्यावर वार करुन त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

हडपसर परिसरात प्रदीप शिवाजी गवळी (वय २६, रा. पंधरानंबर) असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलीसांनी भाऊ मनोज शिवाजी गवळी (वय २९, लोहारा, जि. उस्मानाबाद) याला पकडले आहे. हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पैशाच्या वादातून खून झाल्याचा अंदाज -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप व मनोज हे सख्खे भाऊ आहेत. प्रदीप हा लहान असून, मनोज हा मोठा भाऊ आहे. प्रदीप अधून-मधून दारू पित होता. मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील दोघेही कामानिमित्त गेल्या काही वर्षांपासून पुण्यात राहतात. प्रदीप रिक्षा चालवत असे. तर, मनोज हा केटरींगची कामे करत होता. त्यानंतर त्याने काही दिवस ट्रॅव्हल्समध्ये देखील काम केले आहे. दरम्यान, त्यांच्यात पैशांवरून वाद असण्याची शक्यता असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. ते पंधरा नंबर येथे एका इमारतीत दहा बाय दहाच्या खोलीत भाड्याने राहत होते.

हे ही वाचा -विरारमध्ये टॅंकरची दुचाकीला धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू



गळ्यावर वार करून खून -

दरम्यान, चौकात प्रदीप गवळी याचा मृतदेह पडला असल्याची माहिती नागरिकांनी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. त्यानंतर हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू अडागळे यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. प्रदीप गवळी याच्या गळ्यावर वार करुन त्याचा खून करण्यात आल्याचे आढळून आले होते.

माझे पैसे उडवायचा म्हणून केला खून -

चौकशी केल्यानंतर त्याचा मोठा भाऊ मनोज यानेच लहान भावाचा खून केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, तो काही एक काम करत नसत. त्याला दारूचे व्यसन होते. तो पैसे खर्च करायचा. माझेही पैसे उडवायचा यामुळे खून केला असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. परंतु, आणखी काही शक्यता गृहीत धरून पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, मनोज याचा विवाह झालेला आहे. प्रदीप याचा विवाह झालेला नव्हता. मनोज याने प्रथम नातेवाईकांना फोन करून प्रदीपचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर नियंत्रण कक्षाला हा प्रकार समजवला. त्यानंतर पोलीस तेथे पोहचले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details