पुणे- मंगळवारी सायंकाळी आकाशात ढगांची गर्दी झाली आणि त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शहरात धो धो पाऊस बरसला. या मुसळधार पावसामुळे पुण्यातील वडगावशेरी भागातील बैठी घरे आणि अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. घरात शिरलेल्या पावसामुळे अनेकांच्या दैनंदिन वस्तूंचे नुकसान झाले तर घरात शिरलेले पाणी काढण्यासाठी अनेक नागरिक अजूनही कसरत करताना दिसत आहेत.
पहिल्याच पावसात पुणेकरांची दैना, महापालिकेच्या नालेसफाईची 'पोलखोल' - लेटेस्ट न्यूज इन पुणे
मुसळधार पावसामुळे पुण्यातील वडगावशेरी भागातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. या पहिल्याच पावसाने पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. पावसाचे पाणी साचण्याचा धोका आहे, हे माहीत असतानाही पावसाळा पूर्व कामे पूर्ण क्षमतेने होत नाहीत. त्यामुळे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन हे दरवर्षी कुचकामी ठरते.
यंदाच्या पावसाळ्यातील हा पहिलाच दखलपात्र पाऊस म्हणावा लागेल. परंतु या पहिल्याच पावसाने पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. या परिसरातील नागरिकांनी स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांच्याकडे पाणी साचल्याच्या तक्रारी केल्या. त्यानंतर टिंगरे यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना येथील परिस्थितीची माहिती दिली. याशिवाय शहरातील प्रमुख रस्त्यांवर देखील पावसाचे पाणी साचले होते.
वाहनचालकांना या पाण्यातून गाडी काढताना कसरत करावी लागत होती. महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन हे दरवर्षी कुचकामी ठरते. पावसाचे पाणी साचण्याचा धोका आहे, हे माहीत असतानाही पावसाळा पूर्व कामे पूर्ण क्षमतेने होत नाहीत. रस्त्यांवर साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट, नालेसफाई वेळच्यावेळी झाल्यास अशी परिस्थिती उद्भवण्याचे प्रमाण कमी असते.