पुणे -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रचार सभेसाठी शुक्रवारी पुण्याजवळ चाकण येथे आले होते. यावेळी सभेत बोलताना पवार यांनी राज्यातील शेतकरी वर्गाच्या समस्या, शेतीच्या समस्या, चाकण परिसरातील गुन्हेगारीची समस्या यावर सडेतोड भाष्य केले.
राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांच्या चाकण येथील प्रचार सभेत बोलताना शरद पवार महाराष्ट्रात आता फक्त शेती एके शेती करून चालणार नाही - पवार
स्वातंत्र्यावेळी देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती, तीच आता १२० कोटींवर जाऊन पोहोचली आहे. जगात लोकसंख्येबाबत आपला देश दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. यामुळेच शेतजमिनी, विविध औद्योगिक प्रकल्प, धरणे अशा अनेक कारणांमुळे शेतजमिनी कमी झाल्या आहेत. तर दुसरीकडे कुटुंबांचे विभाजन होऊन शेतजमिनींचे वाटप होथ असल्याचे जमिनीचे मोठ्या प्रमाणात तुकडीकरण होत आहे. यामुळे आगामी काळात अनेक कुटुंब अल्पभुधारक व भूमीहिन होण्याची भीती पवारांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा... 'मागच्या ५ वर्षात १४ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारला मात्र देणं-घेणं नाही'
सध्याच्या काळात शेती करत असताना जमिनींच्या वाटपातून विभाजन होत आहे. तर काही जमिनीही कसदार राहिलेल्या नाहीत. त्यामुळे शेतमालाच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होण्याची भीती आहे, अशावेळी शेतीला उद्योग अथवा नोकरीची जो़ड देण्याची गरज शरद पवारांनी यावेळी बोलून दाखवली.
चाकण औद्योगिक नगरीत गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसत आहे - पवार
चाकण औद्योगिक नगरीत जगातील कारखानदारी आली आहे. त्यामुळे चाकण औद्योगिक नगरीला एक ओळख निर्माण झाली, मात्र या उद्योगनगरीत आता चुकीच्या गोष्टी घडत आहे. औद्योगिक वसाहतीत गुन्हेगारी वाढली आहे. याबाबत राज्य सरकारने कठोर भूमिका घेण्याची गरज होती मात्र तसेह होताना दिसत नाही. यामुळे चाकण औद्योगिक वसाहतीची परिस्थिती बिगडली आहे. दुसरीकडे या ठिकाणी स्थानिकांना रोजगार मिळण्याची गरज होती. मात्र तसे न घडता परराज्यातील लोकांना नोकऱ्या मिळत आहेत, त्यामुळे ज्या उद्देशाने औद्योगिक नगरीला उभारले त्याचे आजचे वास्तव पाहता, 'औद्योगिक वसाहत उभारली कशासाठी आणि झाले काय' असा सवाल शरद पवारांनी जाहीर सभेत केला.
हेही वाचा... देशात मॉब लिंचींग आहे, हे संघाने मान्य करावे; ओवैसींचे संघावर टिकास्त्र
खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना सोडणार नाही
चाकण येथे मराठा समाजाचे आंदोलन झाले. त्या आंदोलनाला हिंसक वळण लागले त्या हिंसक आंदोलनाचा ठपका माजी आमदार मोहिते पाटलांवर ठेवत सूडबुद्धीने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पवार यावेळी म्हणाले. तसेच पाटील आणि आपल्यावर सूडबुद्धीने गुन्हा दाखल केला जात असल्याचा आरोप पवारांनी यावेळी केला. राज्यसरकारला लोकांचा पाठिंबा मिळत नसल्याने हे असे राजकारण सरकार करत आहे, त्यामुळे तुम्ही चिंता करु नका पुढे आपलेच सरकार येणार आहे. तेव्हा त्यांना सरळ करण्याची ताकद आपल्यात असून ज्यांनी खोटे काम केले, खोटे गुन्हा दाखल केले. त्यांना त्यांची जागा दाखवून देणार असल्याचा इशारा शरद पवारांनी यावेळी दिला.