महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

...तर बैलगाडा शर्यतीसाठी माझी राजकीय आत्महत्या करण्याची तयारी - खासदार अमोल कोल्हे

बैलगाडा सुरू होणारच, बैलगाडा शर्यत बंदी उठवली नाही, तर तुमच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी होऊन तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचवणार, असेही कोल्हे यांनी यावेळी सांगितले.

अमोल कोल्हे
अमोल कोल्हे

By

Published : Aug 15, 2021, 3:10 PM IST

Updated : Aug 15, 2021, 4:46 PM IST

पुणे - मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, ना मला कधी कुठलीही निवडणूक लढायची आहे, ना मला कोणतीही महत्वाकांक्षा आहे. त्यामुळे जर बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी एका राजकीय व्यक्तीची राजकीय आत्महत्या होत असेल, तर याला माझी तयारी आहे,असे वक्तव्य खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाषणातून केले आहे.

खासदार अमोल कोल्हे

'...तर खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी होणार'

शिरुर लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न बैलगाडा शर्यत. हा सुरू करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असल्याचे अमोल कोल्हे यांनी बैलगाडामालक व बैलगाडा प्रेमींना आवाहन केले. तसेच बैलगाडा सुरू होणारच, बैलगाडा शर्यत बंदी उठवली नाही, तर तुमच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी होऊन तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचवणार, असेही कोल्हे यांनी यावेळी सांगितले. यावेळी सर्वच पक्षातील कार्यकर्ते, आमदार, प्रमुख बैलगाडा मालक संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी व बैलगाडा मालक आणि प्रेमी यांच्यात झालेल्या बैठकीत डॉ.अमोल कोल्हे बोलल होते. जुन्नरचे आमदार अतुल बेनके, मावळचे आमदार सुनील शेळके, पुरंदरचे आमदार संजय जगताप यांसह राजकीय मंडळी, मालक, चालक, वाजंत्री, बैलगाडा संघटनांचे प्रतिनिधी व बैलगाडा प्रेमींनी आपले मत मंचावर व्यक्त केले. या सर्व भाषणानंतर आक्रमक झालेल्या बैलगाडा मालक व शौकिनांना कोल्हे यांनी आपल्या भाषणातून शांत केले.

हेही वाचा -शिवसेनेची आडकाठी नाही.. केंद्रीय मंत्री गडकरींच्या लेटर बॉम्बवर खासदार गवळी यांचे उत्तर

Last Updated : Aug 15, 2021, 4:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details