पुणे:- 10 ऑक्टोबरला सर्वत्र जागतिक मेंटल हेल्थ डे ( World Mental Health Day ) साजरा केला जातो. प्रत्येकजण मानसिक दबावातून ( mental stress ) जात आहे. पण फार कमी लोक त्याला महत्त्व देतात. या अज्ञानामुळे तो मानसिक तणाव, नैराश्य, उन्माद, स्मृतिभ्रंश, फोबिया यासारख्या मानसिक आजाराचा बळी ( Young victims of mental illness ) ठरतो. जागतिक मानसिक आरोग्य दिवस ( World Mental Health Day ) हा दिवस म्हणजे 10 ऑक्टोबर रोजी जगभरात मानसिक आरोग्याचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी साजरा केला जातो. लोकांमध्ये मानसिक समस्यांविषयी जागरूकता पसरवणे हा त्याचा हेतू आहे. जागतिक मेंटल हेल्थ डे च्या निमित्ताने पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच इतिहास काय आहे. कशा पद्धतीने इथ उपचार दिले जातात.हे जाणून घेऊया....
काय आहे इतिहास...प्रादेशिक मनोरुग्णाया हे सुरवातीला 1907 साली कुलाब्यात सुरू करण्यात आलं होत.तेव्हा त्याची बेडची व्यवस्था ही 700 होती.त्यानंतर 1915 नंतर हे रुग्णालय एका विशेष गाडीने पुण्यातील येरवडा येथे हलविण्यात आल. हे रुग्णालय या परिसरात 85 एकर मध्ये पसरलेला आहे. ज्यात रुग्णालय,विविध विभाग, कॉटर,अशी विभागणी करण्यात आली आहे. सुरवातीला ब्रिटिशांच्या काळात जेव्हा हे रुग्णालय इथ आलं तेव्हा याच नाव रुग्णालय नव्हत. तर मनोरुग्णांसाठी असायलंम होत. शहरातील अशी जागा जिथं हे लोक व्यवस्थितपणे राहू शकता. यांच्यामुळे कोणालाही त्रास नको म्हणून हे रुग्णालय असायलंम नावाने ओळखलं जाऊ लागत होत. त्यानंतर जस जस सुधारणा होत गेल्या तसं तस याच स्वरूप, नाव बदलत गेलं. नंतर प्रादेशिक मनोरुग्णालय अस नाव झाल. आत्ता अंतरुग्नांसाठी 2 हजार 540 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.अशी माहिती व्यवसायिक उपचार तज्ञ डॉ.स्नेहल सहस्त्रकर यांनी यावेळी दिली.
मानसिक रुग्ण संख्येत वाढ - पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालया बेडची क्षमता ही 2 हजार 540 असून सध्या पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात 1 हजार 180 रुग्ण हे ऍडमिट आहे. त्यात 667 रुग्ण पुरुष आहे तर 513 रुग्ण या महिला आहेत. या रुग्णांना दरोरोज औषधोपचार तसेच त्यांना औषधोपचार बरोबरच विविध प्रशिक्षण,तसेच विविध शिबिर घेतले जातात. तसेच डॉक्टरांकडून दरोरोज तपासणी केली जाते. पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात 954 कर्मचारी असून त्यातील 650 पदे ही भरलेली असून बाकीचं रिक्त पदे आहेत. राज्यात एकूणच मानसिक रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना काळात बेरोजगारी, आजारपणातून मानसिक आधाराची गरज असलेले रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. सध्या रुग्णालयात सॅक्रेटरीसची जागा कमी असून ती भरली गेली पाहिजे. अंतरुग्ण, बाह्यरुग्ण रुग्ण असे दोन्ही विभागाच्या माध्यमांतून रुग्णांवर उपचार केले जातात. बाह्यरुग्णमध्ये रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार दिलं जातं. दरोरोज जवळजवळ 100 बाह्यरुग्णांची तपासणी केली जाते.अशी माहिती यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ लता पांढरे यांनी दिली.