पुणे :पुणे शहरातील मध्यवर्ती नानापेठेतील नवा वाडा भागात सोमवारी मध्यरात्री पूर्ववैमनस्य आणि वर्चस्ववादातून एका तरुणाचा चाकूने भोसकून निर्घृण खून ( Brutal murder ) करण्यात आल्याची घटना घडली होती. यात अक्षय लक्ष्मण वल्लाळ (वय २८, रा. नवा वाडा, नाना पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अक्षय वल्लाळ याच्या समर्थनार्थ तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी यामागणीसाठी नाना पेठ नवा वाडा येथील तब्बल 300 हून अधिक रहिवाशांनी समर्थ पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा काढला आहे.
आरोपीला शिक्षेची मागणी - आरोपीला तात्काळ शिक्षा देण्यासाठी नानावाडा येथील नागरिकांनी आज समर्थ पोलीस ठाण्यात मोर्चा नेला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक याची भेट घेऊन आरोपीना कडक शिक्षा ( Citizens demand to punish accused ) देत, या गुन्ह्यात त्याच्या घरातील सहभागी व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली. यावेळी पोलीस स्टेशनच्या परिसरात तीनशेहून अधिक नागरीक जमा झाले होते. तसेच या खूनामागे मुंबईतील गँगचे कनेक्शन असण्याची शक्यता अशा परिस्थितीत नागरिक भीतीच्या छायेत आहेत. या दहशतीतून मुक्तता करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
या प्रकरणी दोघांना अटक -अक्षय, तसेच आरोपी नाना पेठ परिसरातील नवा वाडा परिसरात राहतात. अक्षय वल्लाळ हा नानापेठ परिसरात सामाजिक कार्यकर्ता असून समाजात त्याची चांगली ओळख होती. यामुळेच आरोपी त्याच्यावर चिडून होते. याच कारणावरून त्यांचे यापूर्वी देखील भांडण झाले होते. दरम्यान सोमवारी मध्यरात्री अक्षय हा नानावाडा परिसरात मित्रांसोबत गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी आरोपींनी बेसावध असलेल्या अक्षय याच्यावर प्राण घातक हल्ला ( Assaulted ) केला. अवघ्या 30 सेकंदात आरोपींनी त्याच्यावर 35 वार केले. इतकेच नाही तर तो खाली पडल्यानंतर सिमेंटच्या ब्लॉकने त्याच्या डोक्यात वार केले. गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा उपचारादरम्यान मृत्यू ( Akshay died during treatment ) झाला. या प्रकरणी पोलिसांनी महेश नारायण बुरा, किशोर अशोक शिंदे (दोघेही रा. नाना वाडा, नाना पेठ) यांना अटक केली आहे.
दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री पुणे शहरातील मध्यवर्ती नानापेठेतील नवा वाडा भागात पूर्ववैमनस्य आणि वर्चस्ववादातून मित्रानेच मित्राचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला (friend killed friend ) होता. यात अक्षय लक्ष्मण वल्लाळ (वय २८, रा. नवा वाडा, नाना पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अतिशय भयानक पद्धतीने वल्लाळ याच्यावर वार करून त्याची हत्या करण्यात आली होती. एकूणच ही घटना का घडली. यामागील कारणे काय आहे हे जाणून घेऊया ..