पुणे -सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील संशयित शार्पशूटर संतोष जाधवसह नवनाथ सुर्यवंशीच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पुणे पोलिसांनी संतोष आणि नवनाथला गुजरातमधून अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोघांनाही रात्री उशीरा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. संतोषला 2021 मध्ये पुण्यात घडलेल्या राण्या बानकिले हत्याकांडातील मुख्य आरोपी असल्याने अटक केल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
काय आहे राण्या उर्फ ओमकार बानखेले हत्याकांड -संतोष जाधवची राण्या उर्फ ओमकार बानखेले याच्याशी मैत्री होती. मात्र कोरकोळ कारणावरुन संतोष आणि राण्याचा वाद झाला. या वादातून एकलहरे गावात राण्याचा 2021 खून केल्याचा आरोप संतोषवर आहे. दोन वर्षापासून खून केल्यानंतर संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ फरार झाले होते. हे दोघेही पंजाबमध्ये राहत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. हे दोघे ही लॉरेन्स बिश्नोई टोळीमधले असल्याचे समोर आले. पुणे ग्रामीण पोलिसांनी पंजाब पोलिसांनी सीसीटीव्ही पाहून संतोष जाधवची माहिती सांगितली होती.
शार्प शूटर संतोष जाधव सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी -सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडात पुणे कनेक्शन असल्याचे पुढे आल्यानंतर राज्यात प्रचंड खळबळ उडाली होती. पुण्यातील सौरव महाकाल आणि संतोष जाधव या दोन कुख्यात आरोपीचा सिद्धूच्या हत्याकांडात सहभाग असल्याने पंजाब पोलीस त्यांच्या मागावर आहे. दुसरीकडे पुण्यात घडलेल्या हत्याकांडाच्या घटनेतही पुणे ग्राणीण पोलीस सौरव महाकाल आणि संतोष जाधव या दोघांच्या मागावर होते. मात्र हे दोघेही मिळून आले नव्हते. सिद्धू मुसेवाला हत्याकांडात या दोघांची नावे आल्याने हे पंजाबमध्ये सक्रिय असल्याचे उघड झाले. त्यामुळे पुणे पोलीस खडबडून जागे झाले. पुणे पोलिसांनी अगोदर सौरव महाकालच्या मुसक्या आवळल्यानंतर रात्री संतोष जाधवलाही गुजरातमधून अटक केली.
बिश्नोई गँगने महाराष्ट्रातून बोलावले होते शार्प शूटर -गायक सिद्धू मुसेवाला याच्यावर हल्ला करण्याकरता बिश्नोई गँगने महाराष्ट्रातून दोन शार्प शूटर बोलावले होते. संतोष जाधव आणि महाकाल हे दोन शूटर असल्याचे पंजाब पोलिसांनी जाहीर केले होते. मुसेवालाची हत्या करण्यासाठी एकूण चार राज्यातून शूटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते. 3 शूटर्स पंजाबमधील होते. 2 महाराष्ट्रातले, 2 हरियाणातील आणि यामधील एक शूटर्स हा राजस्थानमधील असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.