महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'नवरी मिळे नवऱ्याला' वेबसाईटवरून ओळख झालेल्या 27 वर्षीय तरुणीवर बलात्कार - threat

'नवरी मिळे नवऱ्याला' या लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवरून ओळख झालेल्या 27 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना पुण्यात समोर आली आहे. आरोपी राहुल प्रकाश दास लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार बलात्कार करत होता.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

By

Published : Jul 5, 2019, 11:04 AM IST


पुणे- 'नवरी मिळे नवऱ्याला' या लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवरून ओळख झालेल्या तरुणीवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना पुण्यात समोर आली आहे. याप्रकरणी २७ वर्षीय पीडित तरुणीने वाकड पोलिसात फिर्याद दिली आहे.

राहुल प्रकाश दास असे आरोपीचे आरोपीचे नाव आहे. घटनेसंबधी कुठे वाच्यता केल्यास अश्लील फोटो सोशल मीडियावर वायरल करण्याची तसेच जिवे मारण्याची धमकी आरोपीने तरुणीला दिली होती.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल दास याने 'नवरी मिळे नवऱ्याला' या वेबसाइटवरून फिर्यादी पीडित तरुणीशी ओळख केली. हळू हळू ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. परंतु, याचा गैरफायदा घेत त्याने लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर वारंवार बलात्कार केला.

घटनेची माहिती कुटुंबाला दिली तर जिवे मारण्याची धमकी पीडित तरुणीला राहुल याने दिली होती. तसेच अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून आई वडील आणि नातेवाईकांना पाठवेल असा दमदेखील त्याने पीडीतेला दिला. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिसात फिर्याद दिली नव्हती. मात्र, वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून तिने पोलिसात धाव घेतली.


अद्याप आरोपी राहुल दास याला अटक करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. त्याचा शोध वाकड पोलीस घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details