पुणे - पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर पुणे महापालिकेच्यावतीने लावण्यात आलेल्या निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, विविध राज्यात असलेल लॉकडाऊन आणि कोरोना काळात दुकानदारांना बसलेला आर्थिक फटका यामुळे शहरात काही दुकाने अजून बंदच आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोबाईल मार्केटमध्ये फक्त 40 टक्केच दुकाने सुरू आहेत.
प्रतिनिधींनी घेतलेला आढावा हेही वाचा -'विद्यापीठाला लागलेलं ग्रहण सुटलं!' कुलगुरूंच्या कार्यमुक्तीनंतर विद्यार्थ्यांचे निषेध आंदोलन
- अनेक व्यापारी अजून गावलाच
पुणे शहरात मोठ्या प्रमाणात विविध राज्यातील कामगार काम करत असतात. तर काही व्यापारी देखीव शहरात भाड्याने दुकाने घेऊन व्यवसाय करत असतात. मात्र, कोरोनाच्या पाश्वभूमीवर गेल्या दिड वर्षाहून अधिक काळापासून लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे या व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे दुकान बंद व भाडे सुरू असल्याने अनेकांनी तर दुकाने बंद करून थेट आपापल्या गावाला निघून गेले, तर काही कामगार आणि व्यापारी अजूनही त्यांच्या त्यांच्या राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अजून पुण्यात न आल्याने काही ठिकाणी कामगार कमी आहेत, तर काही ठिकाणी दुकानच बंद ठेवण्यात आली आहेत.
- मोबाईल मार्केटमध्ये फक्त 40 टक्केच दुकाने सुरू
पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या मोबाईल मार्केटमध्ये 100 हून अधिक दुकाने आहेत. या मार्केटमध्ये जास्त करून राजस्थान आणि बिहार या ठिकाणचे कामगार आणि व्यापारी वर्ग आहे. अनेक जण शहरात लॉकडाऊनआधीच आपापल्या गावाला गेल्याने परत आलेच नाहीत. तसेच त्या राज्यांमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पुण्यात जरी दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आल असला तरी त्या कामगार आणि व्यापाऱ्यांना येता येत नाही. तसेच लॉकडाऊनमुळे फक्त भाडे सुरू असल्याने काही दुकानदारांनी दुकानेच बंद केल्याने या मार्केटमध्ये फक्त 40 टक्केच दुकाने सुरू आहेत.
लॉकडाऊनमुळे मोठ्या आर्थिक संकटाला आम्हा दुकानदारांना सामोरे जावं लागत आहे. सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत फक्त दुकाने सुरू असल्याने फक्त थोडेफार प्रमाणात व्यवसाय होत आहे. शासनाने दुकाने सुरू करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचे स्वागतच आहे, पण अजून काही वेळ वाढवून दिला पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
- लॉकडाऊनमुळे मोठं आर्थिक नुकसान
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे इलेक्ट्रॉनिक मार्केटमधील दुकानदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरे जावं लागलं. दुकान बंद जरी असली तरी दुकानाचे भाडे सुरू होते. कामगारांना काहीतरी पगार द्यावाच लागत होता. एकूणच फक्त बुधवार पेठेतील या मोबाईल मार्केटचा या लॉकडाऊनमुळे कोटयावधीचे नुकसान झालं आहे.
हेही वाचा -मुंबईत एनसीबीची छापेमारी; 2 आरोपींना अटक