महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चंद्रकांत पाटलांना वेगवेगळी स्वप्न पडण्याचा छंद, त्यावर मी काय बोलणार - जयंत पाटील - pune political news

कोरोनाचे कारण आहे. पंतप्रधानाच्या बाबतीत असे बोलू शकतो, केंद्राचे अधिवेशन ज्या कारणाने होत नाही, तेच कारण राज्याला लागू आहे. सर्व राज्यात हीच परिस्थिती आहे, असे पाटील म्हणाले.

जयंत पाटील
जयंत पाटील

By

Published : May 28, 2021, 3:10 PM IST

Updated : May 28, 2021, 4:27 PM IST

पुणे - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे वेगवेगळी वक्तव्य करत असतात, त्यांना स्वप्न पडण्याचा छंद लागला आहे, अशी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. साखर कारखान्यासंबंधीच्या बैठकीसाठी साखर संकुल येथे आले असता त्यांनी हे वक्तव्य केले.

हेही वाचा -'बारा जागांचा प्रस्ताव राज्यपालांकडे आम्हीच नेऊन दिला; पण प्रस्ताव दिलाच नाही म्हणणे हे आश्चर्यकारक'

'महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल'

ते म्हणाले, की महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल आहे, मात्र पाटील यांना स्वप्न पडण्याचा छंद आहे. अधिवेशन न घेण्याचे कारण जगजाहीर आहे. कोरोनाचे कारण आहे. पंतप्रधानाच्या बाबतीत असे बोलू शकतो, केंद्राचे अधिवेशन ज्या कारणाने होत नाही, तेच कारण राज्याला लागू आहे. सर्व राज्यात हीच परिस्थिती आहे, असे पाटील म्हणाले.

हेही वाचा -'समाजात नवे प्रश्न तयार होत असतात, त्याचा आणि सरकारच्या अस्थिरतेचा काय संबंध?'

'उजनीच्या पाण्यावर सोलापूरकरांचा हक्क'

सोलापूरकरांचा उजनी धरणाच्या पाण्यावर जेवढा हक्क आहे, तो कोणीही हिरावून घेणार नाही. सोलापूर जिल्ह्याच्या वाटेचे पाणी कुठेही जाऊ देणार नाही, असे ते यावेळी म्हणाले.

Last Updated : May 28, 2021, 4:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details