पुणे - एकीकडे महागाईचे चटके सहन करणाऱ्या सर्वसामान्यांना आता दूध आणखी महाग मिळणार आहे. राज्यातील सर्व सहकारी व खासगी दूध व्यावसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाने दूधाच्या विक्री किंमतीत प्रति लिटर २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. (The Price of Milk Expensive Two Rupees) दरम्यान, दूध उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार असून खरेदीदरातही प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
सहकारी व खासगी दूध व्यवसायिक उपस्थित होते
ही सभा पुणे येथे दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेस महानंद, चितळे, गोवर्धन, गोविंद, ऊर्जा, शिवामृत, कात्रज, राजहंस, स्फूर्ती, सोनाई, शिवप्रसाद नेचर डिलाइट, रिअल डेअरी, एस. आर. थोरात, अनंत, संतकृपा, सुयोग इत्यादी सहकारी व खासगी दूध व्यवसायिक उपस्थित होते. यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.