पुणे - भोसरी येथे राहणारा अल्पवयीन मतिमंद मुलगा घरातून पळून गेला होता. हा मुलगा पुणे-नाशिक महामार्गावर सैरावरा पळत होता. यावेळी खेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि जागरुक नागरिकांच्या मदतीने मुलाला त्याच्या कुटुंबाकडे स्वाधीन करण्यात आले आहे.
घरातून पळून गेलेल्या अल्पवयीन मतिमंद मुलाला पकडून पोलिसांनी दिले वडिलांच्या ताब्यात - khed police
आज (शनिवारी) दुपारच्या सुमारास प्रणव संजय चोपडे (वय १२) घरातून बेपत्ता झाला होता.
मतिमंद प्रणव चोपडे
आज (शनिवारी) दुपारच्या सुमारास प्रणव संजय चोपडे (वय १२) घरातून बेपत्ता झाला होता. आपले घर आणि परिसर विसरल्याने तो चाकणच्या बाजूने नाशिककडे जाणाऱ्या गाड्यांच्या आडवा पळताना काही नागरिकांना नजरेस पडला. यावेळी त्याला पत्ता व्यवस्थित सांगता येत नव्हता. खेड पोलीस ठाण्याला आणले. पोलिसांनी चौकशी करून त्याच्या पालकांचा पत्ता शोधला आणि त्याच्या वडीलांच्या ताब्यात त्याला देण्यात आले. यावेळी पालक संजय चोपडे यांनी लोकांचे आभार मानले.