पुणे- राज्यातील निर्बंध शिथिल करण्यासाठी पाच टप्पे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये पॉझिटिव्हीटी दर व ऑक्सिजन बेडची उपलब्धता यानुसार जिल्ह्यांची वर्गवारी केली आहे. त्या जिल्ह्यांमधील गेल्या आठवड्यातील आकडेवारीनुसार कोणत्या वर्गवारीत त्याचा समावेश असेल ते ठरवण्यात आले आहेत. दरम्यान, राज्य सरकारच्या आदेशात असलेल्या निकषांनुसार पुणे जिल्हा चौथ्या टप्यात अनलॉक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यसरकारने अनलॉक करताना पुणे शहर आणि जिल्ह्याबाबत वेगळा निर्णय घेण्यात यावे. कारण जिल्हात पॉझिटिव्ही दर जास्त असून पुणे शहरात कमी आहे. त्यामुळे शहर आणि जिल्ह्याबाबत वेगवेगळ निर्णय घेण्यात यावे, असे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.
शहर आणि जिल्ह्याचे स्तर वेगवेगळे करण्यात यावे
राज्याचा विचार करून राज्य शासनाने हि नियमावली केली आहे. पण, याच्यात अडचण अशी आहे की शहर आणि जिल्ह्याच्या पॉझिटिव्ही दरामध्ये खूप फरक आहे. पुणे जिल्ह्यात 10 टक्के पेक्षा जास्त पॉझिटिव्ही दर आहे तर पुणे शहरात 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे. या आदेशात शहर व जिल्हा असे वेगवेगळ आदेश दिसून येत नाही. सरसकट जिल्ह्याप्रमाणे आदेश काढण्यात आले आहे. त्यामुळे राज्य शासनाने जिल्हा आणि शहर याबाबत स्पष्टता द्यावी. शहर आणि जिल्ह्याचे स्तर वेगवेगळे करण्यात यावे, असेही यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.