महाराष्ट्र

maharashtra

गिर्यारोहक मारुती गोळे यांनी सर केले 1236 किल्ले, टपाल विभागाने दखल घेत जारी केले दोन तिकीटं

By

Published : Jun 16, 2022, 7:48 PM IST

Updated : Jun 17, 2022, 3:00 PM IST

पुण्यातील गिर्यारोहक मारुती गोळे ( Maruti Gole ) यांनी सर केलेल्या 1236 किल्ल्यांची दखल पोस्ट ऑफिसने घेतली ( Post Office Release Stamp ) असून त्यांच्या नावाची 2 तिकिटे या पोस्टाने 6 जून रोजी राज्यभिषेक दिनानिमत्ताने ( Rajyabhishek Din ) काढले आहे. त्यांनी फक्त राज्यभरातीलच नव्हे, तर जगभरातील एकूण 1236 किल्यांवर केलेल्या भटकंतीमुळे पोस्टाने त्यांची दखल घेतली आहे.

टपाल विभागाने दखल घेत जारी केले दोन तिकीटं
टपाल विभागाने दखल घेत जारी केले दोन तिकीटं

पुणे - पुण्यातील गिर्यारोहक मारुती गोळे ( Maruti Gole ) यांनी सर केलेल्या 1236 किल्ल्यांची दखल पोस्ट ऑफिसने घेतली ( Post Office Release ) असून त्यांच्या नावाची 2 तिकिटे या पोस्टाने 6 जून रोजी राज्यभिषेक दिनानिमत्ताने ( Rajyabhishek Din ) काढले आहे. त्यांनी फक्त राज्यभरातीलच नव्हे, तर जगभरातील एकूण 1236 किल्यांवर केलेल्या भटकंतीमुळे पोस्टाने त्यांची दखल घेतली आहे.

अशी झाली सुरुवात -लहानपणापासून मित्र संगत चांगली असली की चांगले गुण लागतात हे आपण पाहिलं आहे. ऐकल देखील आहे. कधीकधी तर मित्र मंडळींकडून हीनवल गेलं की माणूस जिद्दित ती गोष्ट करतच असतो. अस काहीस पुण्यात राहणारे मारुती गोळे यांच्याबाबतीत झालं आहे. 2012 साली जेव्हा 107 वजन असलेले पुण्यातील मारुती गोळे हे प्रथमतः हा सिंहगडावर चढत होते तेव्हा त्यांना दम लागत होता आणि तेव्हा त्यांच्या बरोबर असलेल्या मित्रांनी हिनवल. तेव्हा पासून जिद्दीने गोळे यांनी गडावर चढण्याचा निर्णय घेतला आणि आज पाहता पाहता राज्यासह जगभरातील 1236 गडकिल्ले सर केले आहे.

प्रतिक्रिया

कुठ कुठ केली भटकंती -या 1236 गडमध्ये राज्यातील 436 गड, गोव्यातील 33 गड, गुजराथ येथील 153, पंजाब आणि हरियाणा आणि इतर राज्यातील अनेक गड तसेच परदेशातील 14 देशातील 53 गड अश्या एकूण 1236 गडांवर अभ्यास आणि भटकंती गोळे यांनी केली आहे.

पोस्टाने घेतली दखल -जेव्हा माझ्या 1 हजार पेक्षा अधिक गडकिल्ले सर करून झाले तेव्हा पोस्टाच्यावतीने माझ्या या कार्याची दखल घेण्यात आली. 6 जून रोजी राज्यभिषेक दिनानिमत्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते माझ्या फोटोंचे दोन तिकीटच प्रकाशन करण्यात आला. हे जे पोस्टाच्या कडून तिकिटे काढण्यात आले आहे, याचा मला खूपच आनंद होत असल्याचं यावेळी गोळे यांनी सांगितलं.

राजकीय लोकांनी गड दत्तक घ्यावे -आपल्या राज्यातील आणि इतर देशातील गड पाहिले तर आपल्या येथील गडकिल्ल्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास असूनही आपण पाहिजे त्या पद्धतीने गडांच संवर्धन करत नाही. परदेशात एकही प्लास्टिकचा तुकडा गडांवर दिसणार नाही. पण आपल्या इथ परिस्थिती वेगळी आहे. ज्या प्रमाणे आमदार खासदार गांव दत्तक घेतात तसच गड किल्लेदेखील दत्तक घ्यायला हवं अशी अपेक्षादेखील यावेळी गोळे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा -राहुल गांधींची 'ED'चौकशी प्रकरण! देशभर काँग्रेसचे निदर्शने; लोकसभा अध्यक्षांकडेही तक्रार

Last Updated : Jun 17, 2022, 3:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details