पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांनी मशिदीवरील भोंगे ( Loudspeaker On Mosque ) काढण्यासाठी 3 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. यावर राज्यातील राजकारण हे तापलं असताना, मराठा क्रांती मोर्चाने राज ठाकरे यांच्या या भूमिकेचा विरोध केला आहे. जेव्हा मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने राज्यात 58 मोर्चे ( Maratha Reservation Agitation ) निघाले तेव्हा याच मुस्लिम समाजाने मराठा आरक्षणाला पाठिंबा देत ( Muslim Community Supports Maratha Reservation ) मोर्चात पाणी वाटण्याचा काम केलं आहे. म्हणून राजकीय हितासाठी ( Loudspeaker Politics Maharashtra ) मराठा समाजाच्या तरुणांनी माथी फिरवू नये, असं आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आले. त्यामुळे राज ठाकरेंच्या भूमिकेला मराठा क्रांती मोर्चाने एकप्रकारे विरोधच दर्शविला ( Maratha Kranti Morcha Opposes Raj Thackeray ) आहे.
Raj Thackeray : मराठ्यांच्या मुलांना भडकावण्याचं काम करू नका.. राज ठाकरेंच्या भूमिकेला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध
ज्यावेळी महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचे ( Maratha Reservation Agitation ) मोर्चे निघाले त्यावेळी मुस्लिम समाजाने मराठा समाजाला पाठिंबा ( Muslim Community Supports Maratha Reservation ) देत सहकार्य केलं. आता मशिदीवरील भोंग्यांचा ( Loudspeaker On Mosque ) विषय काढून घाणेरडं राजकारण करण्यात येत ( Loudspeaker Politics Maharashtra ) आहे. मराठ्यांच्या मुलांना भडकावण्याचं काम करू नका, अशा शब्दात मराठा क्रांती मोर्चाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध केला ( Maratha Kranti Morcha Opposes Raj Thackeray ) आहे.
सचिन आडेकर
शिवाजी महाराजांनी रायगडावर मस्जिद बांधली : मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने भोंग्यांच्या संदर्भात राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचा विरोध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावर मुस्लिम समाजासाठी मस्जिद बांधली आहे. यासारखं सर्वोत्तम उदाहरण कुठेही मिळणार नाही. महाराजांच्या नावाने आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आमच्या तरुणांना भडकावू नये, असं यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन आडेकर यांनी म्हटलं आहे.