महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात तरुणीची फसवणूक; लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबध ठेवणाऱ्याला काश्मीरमध्ये अटक - sahakarnagar police station

कामाच्या ठिकाणी ओळख झालेल्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी जम्मू-काश्मिरातील कटरा येथून अटक केली आहे. शहजाद वाणी (वय - 30) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नागपुरातील एका तरुणीने सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती.

sahakarnagar police station
पुण्यात तरुणीची फसवणूक; लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबध ठेवणाऱ्याला काश्मीरमध्ये अटक

By

Published : Nov 11, 2020, 8:51 PM IST

पुणे - कामाच्या ठिकाणी ओळख झालेल्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी जम्मू-काश्मिरातील कटरा येथून अटक केली आहे. शहजाद वाणी (वय - 30) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नागपुरातील एका तरुणीने सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती.

पीडित तरुणी आणि आरोपी तरुण पुण्यामध्ये एकत्र कामाला होते. या दरम्यान त्यांची ओळख झाली. आरोपीने तिच्याशी ओळख वाढवली आणि लग्नाचे आमिष दाखवून 2015 ते 2017 या कालावधीत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पुणे, कटरा, जम्मू अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लग्नाच्या आमिषाने बलात्कार केला. तसेच आरोपीने पीडितेचे नग्नावस्थेतील फोटो काढून ते सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन वारंवार जबरदस्ती देखील केली. काही काळानंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला. यानंतर तरुणीने 2 जुलै रोजी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती.

लॉकडाऊनमध्ये पोलीस अडकले

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु तो जम्मू-काश्मीरमध्ये असल्याचे समजले. जुलै महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात लॉकडाऊन असल्यामुळे पोलिसांना जम्मू-काश्मीरमध्ये जाता आले नाही. मात्र, लॉकडाऊनची परिस्थिती निवळल्यानंतर सहकारनगर पोलीस स्टेशनचे एक पथक जम्मू-काश्मीरमध्ये गेले. त्यांनी आरोपीला अटक करून पुण्यात आणले. यासाठी त्यांना जम्मू-काश्मीर पोलिसांची मदत घेण्यात आली.

पुणे पोलिसांनी आज त्याला माघारी आणल्यानंतर न्यायालयात हजर केले. यानंतर संबंधित आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details