पुणे - आर्यन खान प्रकरणात मुख्य पंच असलेल्या किरण गोसावीवर फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसापासून गोसावी पुणे पोलिसांना शरण येणार असल्याचे सांगितले जात असताना आज पुण्यातील कामशेत भागात किरण गोसावी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. पुणे पोलिसांची दोन पथके त्याचा शोध घेत आहेत.
गोसावीच्या एका महिला सहकाऱ्याला अटक -
फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या किरण गोसावीच्या महिला सहकारीला यापूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शेरबानो कुरेशी, असे त्या महिलेचे नाव आहे. शेरबानो कुरेशीसह गोसावीने पुण्यातील तरुणाची तीन लाखांची फसवणूक केली होती. गोसावी विरोधात पुणे पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली आहे. ड्रग्स प्रकरणी आर्यन खानसह इतर जणांना अटक केलेल्या प्रकरणात किरण गोसावी हा पंच आहे.
फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा -
पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात 2018 मध्ये किरण गोसावी आणि तिची महिला सहकारी शेरबानो कुरेशी या दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याच गुन्ह्यात पुणे पोलिसांनी कुरेशीला मुंबईतून अटक केली आहे. महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांमध्ये किरण गोसावीचा शोध घेतला जात आहे.
पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन किरण गोसावी पसार.. महिला सहकाऱ्याला अटक - पुणे पोलिसांना चकमा देऊन किरण गोसावी फरार
आर्यन खान प्रकरणात मुख्य पंच असलेल्या किरण गोसावीवर फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसापासून गोसावी पुणे पोलिसांना शरण येणार असल्याचे सांगितले जात असताना आज पुण्यातील कामशेत भागात किरण गोसावी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे.
हे ही वाचा -शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचा सीडीआर काढण्यासाठी पाच लाखांची ऑफर; क्रूझ ड्रग्स प्रकरणी हॅकरचा दावा
काय आहे नेमके प्रकरण?
किरण गोसावी याने 2018 मध्ये आपल्या फेसबुक अकाऊंटवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी असण्यासंदर्भात पोस्ट टाकली होती. त्या पोस्टवर चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन गोसावीने त्याला मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने तो भारतात परत आला. त्यानंतर त्याने फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्यात गोसावी फरार आहे. त्यामुळे फसवणुकी संदर्भात फरासखाना पोलीस किरण गोसावीचा शोध घेत आहेत. तक्रारदार चिन्मय देशमुख यांच्या माहितीनुसार गोसावीने आपल्यासह पालघर, मुंबई, आंध्र प्रदेश येथील अनेकांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली आहे. दिल्लीतील तरुणांनाही त्याने फसविले आहे. त्यामुळे दिल्ली पोलीसही त्याच्या मागावर आहेत.