महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे पालिकेतील सत्ताधारी भाजपने राजकीय लाभासाठी लसीकरण हायजॅक केले; महाविकास आघाडीचा आरोप

पुणे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपकडून शहरातील लसीकरण मोहीम हायजॅक केली जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी केला आहे.

pune
pune

By

Published : May 14, 2021, 3:08 PM IST

Updated : May 14, 2021, 5:55 PM IST

पुणे - शहरात लसीकरणावरून राजकारण सुरू आहे. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपकडून शहरातील लसीकरण मोहीम हायजॅक केली जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी केला आहे. सत्ताधारी भाजपचे स्थानिक नेते, महापौर, नगरसेवक आणि पदाधिकारी हे लसीकरणावरून घाणेरडे राजकारण करत असल्याचा आरोप या तीनही पक्षांनी केला आहे.

महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद

मर्जीतल्या लोकांना लसीकरण

महापालिकेकडे येणाऱ्या लसीचा साठा हा सत्ताधारी भाजप त्यांच्या मर्जीप्रमाणे वाटत असून भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागात झुकते माप दिले जाते आहे. लसीकरण केंद्रावर भाजपकडून प्रचार सुरू आहे. भाजपचे झेंडे, नेत्यांचे फोटो लसीकरण केंद्रांवर लावले जात आहेत. राजकीय हेतूने भाजपने लसीकरणाची सर्व यंत्रणा ताब्यात घेतली असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.

हेही वाचा -सिंधुदुर्ग व गोव्यात हायअलर्ट; किनारी भागात वाहू लागले जोरदार वारे

भाजप नगरसेवकांना झुकते माप

भाजपचे नगरसेवक असलेल्या भागात पुरेसे लसीकरण केंद्र द्यायचे, त्याठिकाणी लसीचा मुबलक साठा उपलब्ध करून द्यायचा, तर दुसरीकडे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या भागात कमी लसीकरण केंद्र द्यायचे आणि दिले तरी त्या ठिकाणी लसीचा कमी पुरवठा करायचा असे उद्योग महापालिकेतील सत्ताधारी भाजप करत असल्याचा आरोप पुण्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. पुण्यात संयुक्त पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका करण्यात आली. महाविकास
आघाडीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय भोसले यावेळी उपस्थित होते.

भाजपच्या नगरसेवकांनी लसीकरणासाठी टोकन देण्याची नवी पद्धत सुरू करत लसीकरण करताना वशिलेबाजी केली जात आहे. सकाळपासून नागरिक लाईनमध्ये उभे राहतात. त्यांना 50 टोकन देऊन दुपारनंतर आपल्या मर्जीच्या लोकांना टोकन देण्याचे काम भाजपकडून केले जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.

पालकमंत्र्यांकडे गाऱ्हाणे

या सगळ्या संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. पुण्यात लसीकरण करण्यासाठी कॉल सेंटर यंत्रणा सुरू करावी तसेच लसीकरणाची यंत्रणा पूर्णतः राजकीय हस्तक्षेपाशिवाय करावी अशी मागणी केली. त्यावर तातडीने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रशासनाला याबाबतच्या सूचना केल्याचे महाविकास आघाडीने सांगितले. दुसरीकडे लस खरेदीसाठी केल्या जाणाऱ्या जागतिक निविदांबाबत ही भाजपचे गटनेते राज्य सरकारवर खोटे आरोप करत असल्याचे महाविकास आघाडीकडून सांगण्यात आले. जागतिक निविदा टाकण्यासाठी महापालिकांना राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागत नाही. मात्र, भाजपचे गटनेते हे पुणेकरांची दिशाभूल करत, मुंबई महापालिकेला परवानगी दिली. मात्र, पुणे महापालिकेला ग्लोबल टेंडरची परवानगी दिली नाही, असा खोटा आरोप करत असल्याचे महाविकास आघाडीचे म्हणणे आहे.

हेही वाचा -अक्षय तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला 1,111 हापूस आंब्यांची आरास

Last Updated : May 14, 2021, 5:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details