महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे: अखेर पोलिसांनी येऊन बंद केली महात्मा फुले मंडई - pune lockdown

राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र जरी आजपासून कडक निर्बंध लावण्यात आले असले तरी पुण्यातील महात्मा फुले मंडई 12 वाजले तरी चालू होती.

पुणे: अखेर पोलिसांनी येऊन बंद केली महात्मा फुले मंडई
पुणे: अखेर पोलिसांनी येऊन बंद केली महात्मा फुले मंडई

By

Published : Apr 21, 2021, 4:17 PM IST

पुणे - राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र जरी आजपासून कडक निर्बंध लावण्यात आले असले तरी पुण्यातील महात्मा फुले मंडई 12 वाजले तरी चालू होती. नागरिक सुद्धा बेभानपणे खरेदी करत होते. शेवटी पोलिसांनी येऊन महात्मा फुले मंडई बंद केली आहे.

पुणे: अखेर पोलिसांनी येऊन बंद केली महात्मा फुले मंडई
आजपासून कडक निर्बंध-
राज्यात आजपासून कडक निर्बंध लावण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेसह भाजी मंडई देखील सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. पुणे शहरात इतर दुकाने देखील पोलिसांच्यावतीने बंद करण्यात आली आहे. काही नागरिक देखील 11 वाजल्यानंतर खरेदी करण्यासाठी बाहेर पडत आहे. 4 तास वेळ दिली असल्याने काही प्रमाणात आज शहरातील विविध बाजारपेठांमध्ये गर्दी पाहायला मिळाली. सर्वसामान्य पुणेकर अजूनही सरकारच्या वतीने लावण्यात आलेल्या कडक निर्बंधाबाबत गांभीर्याने विचार करताना दिसत नाहीत.
काही दुकाने बंद तर काही सुरू-
राज्यात आजपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले असल्याने शहरात काही ठिकाणी नागरिकांनी बरोबर 11 वाजताच दुकाने बंद केली तर काहींची दुकाने ही सुरूच होती. काही ठिकाणी तर पोलिसांनी येऊन ही दुकाने बंद केली आहेत. शहरात आज कडक निर्बंधांच्या पहिल्याच दिवशी आज काही ठिकाणी दुकाने सुरू तर काही ठिकाणी बंद, अशी चित्र पाहायला मिळाली.

ABOUT THE AUTHOR

...view details