पुणे : महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ( Father of the Nation Mahatma Gandhi ) म्हणून सर्वत्र संबोधले जाते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या तावडीतून देशाची सुटका करण्यासाठी महात्मा गांधी यांनी मोलाचे कार्य पार पाडले आहे. परंतु या सर्व गोष्टी करताना गांधीजींच्या समोर अनेक आव्हाने सुद्धा उभी होती. तरीही महात्मा गांधीजी यांनी कधीच हार न मानत त्याला सामोरे जाण्याची जिद्द आणि एकनिष्ठा दाखवत अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने आपले काम सुरुच ठेवले होते आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. २ ऑक्टोंबरला महात्मा गांधी जयंती ( 2 October Mahatma Gandhi Jayanti ) सर्वत्र साजरी केली जाते. महात्मा गांधी जयंतीच्या ( Mahatma Gandhi birth anniversary ) निमत्ताने पुण्यातील ऐतिहासिक आगाखान पॅलेस आणि महात्मा गांधी यांचं काय संबंध होता. आगाखान पॅलेस ( agakhan palace pune ) मध्ये महात्मा गांधी यांच्या अनेक आठवणी आहेत.
1942 मध्ये महात्मा गांधी यांना याच आगाखान पॅलेसमध्ये नजरकैद करण्यात आलं :आगाखान पॅलेस ही ऐतिहासिक इमारत आहे, ही इमारत पुण्याच्या येरवडा येथे आहे. ही इमारत सुलतान मुहम्मद शाह आगाखान तृतीय यांनी 1892 मध्ये बनविली होती. १९४२ मध्ये चलेजाव चळवळ सुरू झाल्यावर सरकारने महात्मा गांधीजी, कस्तुरबा गांधीजींचे स्वीय सचिव महादेवभाई देसाई आणि प्यारेलाल तसंच काही काळानं गांधीजींच्या शिष्या मीराबेन आणि वैद्यकीय सल्लागार डॉ. एम. डी. डी. गिल्डर यांनाही या पॅलेसमध्ये नजरकैद ठेवण्यात आले. जयप्रकाश नारायण यांच्या पत्नी प्रभावती, सरोजिनी नायडू यांनाही काही काळ येथे ठेवण्यात आले होते. 10 ऑगस्ट १९४२ पासून गांधीजींची कैद सुरू झाली. पुण्यातील ब्रिटिशांच्या दडपशाहीच्या विरोधात गांधीजींनी येथेच उपवास सुरू केला. तब्बल 21 महिने महात्मा गांधी याच आगाखान पॅलेसमध्ये नजरकैद होते. 6 मे 1944 साली महात्मा गांधी यांना सोडण्यात आलं होत.
कस्तुरबा यांना कॅरम मधील राणी मिळाली नाही की, याची तक्रार महात्मा गांधी यांना करत असतं :महात्मा गांधी हे नजरकैद असताना आगाखान पॅलेसमध्ये ते दररोज सकाळी लवकर उठून ध्यान करने, प्रार्थना करणे तसेच पुस्तक लिहिणे अस त्यांचं राहणीमान होत. महात्मा गांधी यांनी आरोग्याची चाबी हे पुस्तक आगाखान पॅलेसमध्ये लिहिलं आहे. तसेच या ठिकाणी गांधीजी हे त्यांच्या पत्नी कस्तुरबा यांना लिहायला तसेच वाचायला शिकवत होत्या. तसेच अनेक लोकांना पत्रव्यवहार अस काम महात्मा गांधी हे करत असे. तसेच महात्मा गांधी पॅलेसमध्ये असताना कस्तुरबा आणि मिराबेन ह्या कॅरम खेळत होते. कॅरम खेळत असताना जर कस्तुरबा यांना राणी मिळत नसेल तर ते खूप चिडचिड करत असे, त्याची तक्रार महात्मा गांधी यांना करत होते. तसेच महात्मा गांधी हे कस्तुरबा यांना कविता म्हणायला देखील शिकवत होते. अशा अनेक आठवणी गाईड निलम महाजन यांनी यावेळी सांगितल्या.
आगाखान पॅलेस मध्ये महात्मा गांधी यांचे दोनदा वाढदिवस झाले साजरा : महात्मा गांधी आगाखान पॅलेसमध्ये बंदिस्त असताना त्यांचे दोन वेळा वाढदिवस ही या पॅलेसमध्ये साजरा करण्यात आले. महात्मा गांधी यांची ईच्छा नव्हती की, त्यांचा वाढदिवस हे साजरा व्हावा. पण पॅलेसमध्ये असणाऱ्या लोकांनी महात्मा गांधी यांचा वाढदिवस साजरा केला. एकदा तर दोन ऑक्टोबर च्या मध्यरात्रीच पॅलेसमध्ये बकरी आणण्यात आली आणि जेव्हा महात्मा गांधी उठले तेव्हा त्यांना त्या बकरीच दूध उकळून देण्यात आलं आणि याच दिवशी सरोजिनी नायडू यांनी जेवण बनविले. त्यात कोबीच सूप, उकळलेल्या भाज्या आणि खजूर अस सात्विक जेवण गांधीजींसाठी बनविण्यात आले होते.