पुणे - शिवसेनेचे बंडखोर आमदार ( Rebel MLA ) एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या विरोधात राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. काल दिवसभरात पुणे शहरात प्रत्येक मतदार संघात आंदोलन झल्यांनंतर आज देखील आक्रमक शिवसैनिकांनी हडपसर गाडीतळ ते अमरधाम स्मशानभूमीपर्यंत बंडखोर आमदाराची पाच रुग्णवाहिकेमधून अंत्ययात्रा काढत, प्रतिकात्मक अंत्यसंस्कार ( Funeral) काढण्यात आली.
शिवसैनिक आक्रमक -शिवसेनेचे नेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 हून अधिक शिवसेना आमदारांसह शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले आहे. यामुळे राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हडपसर येथील गाडीतळ ते अमरधाम स्मशानभूमीपर्यंत बंडखोर आमदाराची अंत्ययात्रा काढण्यात आली. पाच रुग्ण वाहिकेमधून ही अंत्ययात्रा काढत प्रतिकात्मक अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बंडखोर आमदाराच्या फोटोला जोडे देखील मारण्यात आले. शिवसेना ही कार्यकर्ते,नेते तयार करणारी फॅक्टरी आहे. हे सर्व बंडखोर आमदारांनी लक्षात ठेवाव. आम्ही सर्व शिवसैनिक शेवटच्या श्वासा पर्यन्त शिवसेना आणि उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे यांच्या सोबत असणार असल्याची ग्वाही यावेळी शिवसैनिकांनी दिली.