मुंबई -महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाने बुधवारी (दि. 20 एप्रिल) राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे परिपत्रक काढले ( Maharashtra Police Officers Transfer ) आहे. या परिपत्रकानुसार संदीप कर्णिक ( Sandeep Karnik ) यांची पुण्याचे नवीन पोलीस सहआयुक्त ( Joint Police Commissioner of Pune ) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
कोण आहेत संदीप कर्णिक -संदीप कर्णिक हे सध्या बृहन्मुंबईच्या पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरीक्त पोलीस आयुक्त आहेत. तर त्यांची वर्णी आता पुण्याचे सहपोलीस आयुक्तपदी लागली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक पदाच्या दर्जावरुन विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या पदावर पदोन्नती देण्याकरीताच्या प्रक्रियेतून कर्णिक यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
संदीप कर्णिक हे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक असतानाच मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता. या संपूर्ण घटनेची तेव्हा राज्यभरात चर्चा झाली होती. त्यानंतर संदीप कर्णिक यांची तातडीने बदली करण्यात आली होती. संदीप कर्णिक आता पुण्याचे नवे सहपोलीस आयुक्त असणार आहेत.