पुणे -केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) संलग्नत्वाला पालकांनी विरोध केला म्हणून माईर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुल शाळेने जवळपास ५० विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे दाखले पोस्टाने घरी पाठवले आहेत. त्यामुळे पालकांना मानसिक धक्का बसला असून, शाळेच्या व्यवस्थापनाच्या विरोधात त्यांनी संताप व्यक्त केला आहे. सरकारने शाळेविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी पालकांच्यावतीने करण्यात आली आहे.
हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष: पालघरच्या किनारपट्टीवर देशी-विदेशी पाहुण्यांचे आगमन
कोथरूडमधील एमआयटी विश्वशांती गुरुकुल शाळा राज्य मंडळाशी संलग्न होती. या शाळेने 'सीबीएसई' संलग्नत्व घेतले. ही संपूर्ण प्रक्रिया होत असताना, पालकांनी शाळेच्या विरोधात आंदोलने केली. तसेच शालेय शिक्षण विभागाकडे तक्रार ही केली. मात्र, विभागाने नोटीस पाठवण्याच्या पलीकडे कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यानंतर पालकांनी शालेय राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे तक्रार केली. कडू यांनी चौकशी करून सीबीएसई शाळेची एनओसी रद्द करण्याच्या कार्यवाहीचे आदेश दिले. मात्र, त्यावर कार्यवाही झाली नसल्याचे समोर आले आहे. आता ऑनलाईन शाळा सुरू होऊन सहा महिने झाले आहेत. शाळेचं काहीच गणित आम्हा पालकांना कळत नाही. आता पोस्टाने शाळा सोडल्याचे दाखले पाठवले आहेत. आम्ही करायचं काय? आता कुठे अॅडमिशन मिळेल आमच्या मुलांना? असे प्रश्न यावेळी पालकांनी उपस्थित केले आहेत.
शाळा सोडल्याचे पोस्टाने पाठवलेले दाखले हेही वाचा -नागपूरमधून 'पॉझिटिव्ह' बातमी.. ९३ वर्षाच्या आजोबांनी केली कोरोनावर मात
माझा मुलगा ४ थीत एमआयटी शाळेत शिकत आहे. गेल्या २ वर्षांपासून शाळेच्या माध्यमातून आमच्यावर मनमानी कारभार चालू असून, सीबीएसई बोर्डासाठी आमच्यावर सक्ती करत आहे. आम्हाला एसएससी बोर्डातूनच आमच्या मुलांना शिकवायचं आहे. आम्हाला विचारात न घेता शाळा मनमानी कारभार करत आहेत. सरकारने या शाळेवर कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी पालकांनी केली आहे.