महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 6, 2022, 6:45 PM IST

ETV Bharat / city

Mulshi Landslide : माळीणची पुनरावृत्ती होण्याची शक्यता, मुळशीच्या 'या' गावातील नागरिकांचे स्थलांतर

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात गुटके गावात जमीन खचली ( Landslide In Gutka Village Mulshi Taluka ) आहे. त्यामुळे येथील 14 कुटुंबाचे स्थलांतरित करण्यात आलं आहे.

Mulshi Landslide
Mulshi Landslide

पुणे - एक महिना पाऊसाने हुलकावणी दिल्यानंतर राज्यासह पुणे जिल्ह्यात ( Pune Rain ) देखील पावसाला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक डोंगराकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात गुटके गावात जमीन खचली ( Landslide In Gutka Village Mulshi Taluka ) आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून मुळशी तालुक्यातील गुटके गावातील 14 कुटुंबांना दरीतील मोकळ्या जमिनीवर बांधलेल्या तात्पुरत्या निवासी इमारतींमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे.

गुटके गावाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी ( 6 जुलै ) भेट दिली. गुटके वस्तीच्या वरील जागेवर असलेली जमीन 1 फूट सरकली आहे. ही बाब मागील वर्षी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास गावातील सरपंच वाईकर यांनी आणून दिले होते. अधिक अभ्यास केल्यावर असे आढळून आले की तेथे जमीन सरकली आहे. कठोर खडकाच्या पृष्ठभागावर उप-पृष्ठीय प्रवाह देखील होता. ते धोकादायक असल्याने रहिवाशांना गेल्या वर्षी पुणे जिल्हा परिषदेने बांधलेल्या सभा मंडपात स्थलांतरित करण्यात आले आहे.

जमीन खचल्याची माहिती देताना सरपंच आणि स्थलांतरीत करण्यात आलेल्या नागरिकांची प्रतिक्रिया

गावचे सरपंच वाईकर यांनी दान केलेल्या जमिनीवर फियाट इंडिया प्रायव्हेट लिमीटेडच्या सहाय्याने प्रत्येकी 2 खोल्या असलेली 16 घरे बांधण्यात आली आहे. तसेच, पुणे जिल्हा परिषदेने गोठा, पाणीपुरवठा योजना आणि इतर मूलभूत सुविधा देखील याठिकाणी बांधल्या आहे.निवासस्थानांसाठी पलंग आणि गाद्याही देण्यात आल्या आहेत. हे स्थलांतर केल्याबद्दल मुळशीचे गटविकास अधिकारी संदीप जठार आणि सरपंच यांचे गावकऱ्यांनी यावेळी आभार मानले.

हेही वाचा -Boat Stuck in River Video : नदीत अडकली नाव; नावड्याच्या प्रसंगावधानाने वाचले 10 शेतकऱ्यांचे जीव

ABOUT THE AUTHOR

...view details