पुणे - राष्ट्रीय तपास यंत्रणेने सत्र न्यायालयात कोरेगाव भीमा प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांसाठी याचिका दाखल केली आहे. यानुसार संबंधित प्रकरणाशी निगडीत सर्व रेकॉर्ड्स पुढील कारवाईसाठी विशेष न्यायालयात दाखल करण्यात येणार आहेत. तसेच या प्रकरणी नव्याने खटला दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कोरेगाव-भीमा प्रकरण : एनआयची पुणे सत्र न्यायालयात याचिका; नव्याने दाखल होणार खटला - Koregaon Bhima Case
राष्ट्रीय तपास यंत्रणेने सत्र न्यायालयात कोरेगाव भीमा प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांसाठी याचिका दाखल केली आहे. यानुसार संबंधित प्रकरणाशी निगडीत सर्व रेकॉर्ड्स पुढील कारवाईसाठी विशेष न्यायालयात दाखल करण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने सत्र न्यायालयात कोरेगाव भीमा प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांसाठी याचिका दाखल केली आहे.
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या अखत्यारीत तपास सुरू असलेल्या कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयावर राज्य सरकारडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
आता एनआयए कडून यासंबंधी नव्याने खटला लढवला जाणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे.