पुणे- आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील पंच किरण गोवासी फरार झाला होता. त्याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी लुक आऊट नोटीस बजावली होती. त्यानंतर त्याने शरण येण्याची पोलिसांना विनंती केली होती. पण युपी पोलिसांसमोर शरण येण्याची अट त्याने घातली होती. त्यामुळे पुणे पोलिसांचे एक पथक त्याला अटक करण्यासाठी लखनौला गेले होते. पण त्याला पुण्यातच अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेतून आर्यन खान प्रकरणातील या ३ प्रमुख प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
१) किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने आरोप केला आहे, की आर्यन खानला या प्रकरणात न गुंतवण्यासाठी २५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्यातील ९ कोटी रुपये एनसीबीचे डायरेक्टर समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते. यासंदर्भात त्याने एनडीपीएस कोर्टात एक प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. हे खरे की खोटे... याचा तपास लावण्यासाठी गोसावीची साक्ष महत्त्वाची ठरणार आहे.