महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर करायला नको होत्या'

महाराष्ट्रात पंढरपूरची निवडणूक असेल किंवा पश्चिम बंगाल व इतर ठिकाणच्या निवडणूक पुढे ढकलता आल्या असत्या, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रचारामुळे वाढलेल्या कोरोनासाठी निवडणूक आयोगाला जबाबदार धरले आहे. पुण्यातील कात्रज परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाने सुरू केलेल्या कोविड सेंटरचे जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. पंढरपूर प्रचारानंतर मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढली याबाबत विचारले असता ते बोलत होते.

'निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर करायला नको होत्या'
'निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर करायला नको होत्या'

By

Published : Apr 27, 2021, 7:18 PM IST

पुणे - महाराष्ट्रात पंढरपूरची निवडणूक असेल किंवा पश्चिम बंगाल व इतर ठिकाणच्या निवडणूक पुढे ढकलता आल्या असत्या, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रचारामुळे वाढलेल्या कोरोनासाठी निवडणूक आयोगाला जबाबदार धरले आहे. पुण्यातील कात्रज परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाने सुरू केलेल्या कोविड सेंटरचे जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. निवडणूक आयोगाने मुदतवाढ द्यायला हवी होती. बंगालमध्ये ममता सरकारला 4 महिने मुदतवाढ मिळाली असती तर काय फरक पडला असता. नागरिक एकत्र आले म्हणून कोरोना वाढतो, आयोगाने निवडणुका लावल्या नसत्या तर हा प्रकार टाळू शकलो असतो, असेही जयंत पाटील म्हणाले.

'निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर करायला नको होत्या'
सुजय विखेंवर टीकाएखाद्या लोक प्रतिनिधीने अशाप्रकारे औषधसाठा करून ठेवणे कितपत योग्य आहे, सुजय विखे यांच्याकडे इंजेक्शनचा असा साठा आहे. हे माहीत असतं तर आम्ही डॉक्टर तसेच रुग्णालयांना त्यांच्याकडे पाठवले असते. अशा शब्दात पाटील यांनी सुजय विखेंवर टीका केली.चंद्रकांत पाटलांना टोलाअजित पवारांवर पूर्ण राज्याची जबाबदारी आहे. ते कोविड स्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. पुण्याचा कोणताही प्रश्न तयार झाला, तरी ते उपलब्ध आहेत. त्यामुळे काहीतरी बोलायचे म्हणून चंद्रकांत पाटील, अजित पवारांवर टीका करतात, असा टोला जयंत पाटील यांनी यावेळी लगावला.'लसीची उपलब्धता वाढली पाहिजे'राज्यात लसीकरण मोहिमेत कुठलाही गोंधळ नसून प्रशासनाने लसीकरण उत्तम प्रकारे राबवले आहे. मात्र लसी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणे गरजेचे आहे. असे पाटील म्हणाले. सध्याची परिस्थिती पाहता सर्वांना लस मिळेपर्यंत तीन ते चार महिन्यांचा कलावधी जाणार आहे असे पाटील म्हणाले.मोफत लसीकरणाबाबत एकत्र बैठकीत निर्णय घेतला जाईल आणि नंतर मुख्यमंत्री जाहीर करतील. असे देखील त्यांनी संगितले. महाराष्ट्रात ऑक्सिजन पुरवठा अगदी काठावर आहे, इतर राज्यांकडून मिळवत आहोत असे पाटील म्हणाले. तसेच लॉकडाऊन वाढवणार का यावर बोलताना, स्थानिक स्तरावर आढावा घेऊन तसेच बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अशा सर्व बाबींचा विचार करून मगच लॉकडाऊनबाबत पुढील निर्णय घेऊ, असे पाटील यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details