पुणे - शहर आणि जिल्ह्यात ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. आरोग्य व्यवस्थेवर ताण येत असून ऑक्सिजन शिवाय रुग्णालये व्यवस्थापन हतबल आहेत. ऑक्सिजनची मागणी दररोज वाढत आहे. मागणी इतका ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने काही रुग्णालयातील रुग्ण दगावत आहेत.
पुण्यातील काही रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा नसल्याने रुग्ण दाखल करणे थांबले - Pune oxygen plants
पुणे शहर आणि जिल्ह्यातून दररोज ३२१.१० टन एवढी ऑक्सिजनची सध्या मागणी आहे. त्यामुळे ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपन्याच्या मर्यादा समोर येत आहेत. शहरातील मोठ्या रुग्णालयात जम्बो कोविड सेंटर मध्ये 36 तास पुरेल इतका बॅकअप ऑक्सिजन स्टॉक असतो. मात्र लहान रुग्णालयांची परिस्थिती बिकट आहे. सद्यस्थितीत शहरातील ४० ते ५० लहान रुग्णालयांनी ऑक्सिजनचा पुरवठा नसल्याने रुग्ण दाखल करून घेणे थांबवले आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यातून दररोज ३२१.१० टन एवढी ऑक्सिजनची सध्या मागणी आहे. त्यामुळे ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपन्याच्या मर्यादा समोर येत आहेत. शहरातील मोठ्या रुग्णालयात जम्बो कोविड सेंटर मध्ये 36 तास पुरेल इतका बॅकअप ऑक्सिजन स्टॉक असतो. मात्र लहान रुग्णालयांची परिस्थिती बिकट आहे. सद्यस्थितीत शहरातील ४० ते ५० लहान रुग्णालयांनी ऑक्सिजनचा पुरवठा नसल्याने रुग्ण दाखल करून घेणे थांबवले आहे. तर काही रुग्णालयातून ऑक्सिजन अभावी रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट केले जात आहे. शहरात तसेच ग्रामीण भागात ऑक्सिजनअभावी रुग्ण दगवल्याच्या घटना दोन रुग्णालयात घडली आहे. तर एका रुग्णालयात 1 तर दुसऱ्या रुग्णालयात 3 रुग्ण ऑक्सिजन अभावी दगावले आहेत.