महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

खासदार डॉ. कोल्हेंना रेल्वे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी घातला घेराव - रिंग रोड प्रकल्प

डॉ. कोल्हे यांना शेतकऱ्यांनी वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समधीस्थळी घेराव घातला. रेल्वे प्रकल्प आणि रिंगरोडच्या प्रकल्पाला आम्हा शेतकऱ्यांचा विरोध आहे. तसेच अधिकाऱ्यांनी आमचं कोणतही म्हणणं ऐकून न घेता जमिनीची मोजणी सुरू केली आहे. आमच्याबरोबर कोणतीही चर्चा करायला अधिकारी तयार नाहीत. असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना घेराव
शेतकऱ्यांना घेराव

By

Published : Jun 27, 2021, 3:09 PM IST

पुणे -शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मतदार संघातील संवाद दौऱ्यात रिंगरोड आणि रेल्वे प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांनी डॉ. कोल्हेंना घेराव घातला. आमच्या जमिनी परस्पर भूसंपादन करून उद्ध्वस्त करण्याचा घाट शासनाने घातला आहे, त्यामुळे या प्रकल्पाला आमचा विरोध असल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

शेतकऱ्यांनी घेराव


डॉ. कोल्हे यांना शेतकऱ्यांनी वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी घेराव घातला. रेल्वे प्रकल्प आणि रिंगरोडच्या प्रकल्पाला आम्हा शेतकऱ्यांचा विरोध आहे. तसेच अधिकाऱ्यांनी आमचं कोणतही म्हणणं ऐकून न घेता जमिनीची मोजणी सुरू केली आहे. आमच्याबरोबर कोणतीही चर्चा करायला अधिकारी तयार नाहीत. तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहात. आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहेत. शेतकऱ्यांच्या व्यथा शासन दरबारी मांडा आणि आम्हाला न्याय द्या, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. या प्रकरणी लवकरच तोडगा काढू शेतकऱ्यांना विश्वासात घेऊ, असेही डॉ. कोल्हेंनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले.

आमच्या मागण्या पूर्ण करा

हेही वाचा -नागपुरात डेल्टा प्लसच्या 8 संशयिताचे नमुने तपासणार, मुंबईतून आलेल्या तरुणीपासून कुटुंबिय बाधित

ABOUT THE AUTHOR

...view details