महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत आयसीएमआर, एनआयव्हीकडून अभ्यास सुरू

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता महाराष्ट्र, केरळ आणि मध्यप्रदेश राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट डेल्टा प्लसचे काही रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर संशोधनही करण्यात येत आहे.

डेल्टा प्लस व्हेरियंट
डेल्टा प्लस व्हेरियंट

By

Published : Jun 24, 2021, 10:05 PM IST

पुणे -देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता महाराष्ट्र, केरळ आणि मध्यप्रदेश राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट डेल्टा प्लसचे काही रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर संशोधनही करण्यात येत आहे.

आयसीएमआर, एनआयव्हीकडून अभ्यास सुरू

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआर आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्था अर्थात एनआयव्हीने आता या डेल्टा व्हेरिएंटवर सध्या भारतात देण्यात येत असलेल्या लस किती प्रभावी आहेत, याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे.

किती प्रभावी
भारतात उपलब्ध असलेल्या आणि अनेक नागरिकांनी घेतलेल्या कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड या लसी घेतल्यावर कोरोनाचा नवा डेल्टा व्हेरिएंट किती प्रभावहीन होतो याचा अभ्यास या माध्यमातून केला जाणार आहे.

अधिक घातक
नव्याने आलेल्या या डेल्टा व्हेरिएंटची प्रसार क्षमता वाढलेली असण्याची शक्यता तसेच फुफ्फुसांना जास्त प्रमाणात चिटकण्याची क्षमता असण्याची शक्यता असून मोनोक्लोनल अँटीबॉडी उपचारांना प्रतिकार करण्याची शक्यता असल्याने हा नवा डेल्टा व्हेरिएंट अधिक घातक ठरू शकतो. ही बाब लक्षात घेऊन यावर उच्च तपासणीची गरज शास्त्रज्ञांना वाटते आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी बाधित क्षेत्रामध्ये योग्य नियंत्रण केले पाहिजे असे शास्त्रज्ञांना वाटत आहे.

संशोधन सुरू
सध्याच्या लसी या डेल्टावर प्रभावी आहेत का? यावरही आता संशोधन अभ्यास केला जात असल्याचे एनआयव्हीकडून सांगण्यात आले आहे. ज्या नागरिकांनी लसीचे डोस घेतले आहेत. त्यांच्यात असलेल्या अँटिबॉडीजच्या न्यूट्रलायझेशनचा बारकाईने अभ्यास केला जात असून डेल्टा व्हेरिएंटच्या बाबतचे निष्कर्ष येत्या काही आठवड्यात मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. यासोबतच आता ज्या राज्यात नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत, त्यांनी ज्या भागातून हे रुग्ण येत आहेत त्याठिकाणी कडक नियंत्रण ठेवून लसीकरणाची गती वाढवली पाहिजे, अशी अपेक्षा तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने कहर केला होता. आता या डेल्टा व्हेरिएंटमध्ये म्युटेशन होऊन त्याच्या स्पाईक प्रोटीनमध्ये के 457 एन म्युटेशन झालेले आहे आणि डेल्टा व्हेरिएंट तयार झाला असून तो घातक आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात 7 हजार 900 जणांची तपासणी करण्यात आली त्यात 21 जणांमध्ये हा नवा स्ट्रेन असलेला विषाणू आढळला आहे.

हेही वाचा-२३४५ कोटींची बँकांची फसवणूक; उद्योगपती गौतम थापरविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details