पुणे - आर्थिक अडचणींमुळे एस टी कर्मचाऱ्यांची आत्महत्या थांबता थांबत नाहीये. आज सकाळी पंढरपूर येथील कार्यशाळेत एका तरुणाने आत्महत्या केली आहे. एस टी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येची 25 वी घटना आहे. अजून किती आत्महत्येची वाट बघणार आहात? असा संतप्त सवाल एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सरकारला केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्काचं वेतन वेळेवर मिळत नाहीये. त्यांना त्यांचं घरभाड भत्ता वेळेवर मिळत नाही. त्यांना महंगाई भत्ता वेळेवर मिळत नाही. तसेच त्यांना जे हक्काचं आहे ते मिळत नाहीये. 4 हजार 849 कोटी रूपयातील तब्बल 15 कोटी अजून मिळालेले नाही. आज एस टी कर्मचारी हा अक्षरशः हा मेटाकुटीला आला आहे. आज आत्महत्याच सत्र वाढतच चालला आहे. कोरोना काळात जीवाची बाजी लावून एस टी कर्मचाऱ्याने काम केलं आहे. हे सरकार हे का विसरत आहे. अस देखील शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
सरकारने आर्थिक देणं लवकरात लवकर द्यावं