महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Hiv through tattoo - टॅटू बनवत असाल तर सावधान..! एचआयव्ही होऊ शकतो, अशी घ्या काळजी - tattoo making tips to avoid hiv

आवड म्हणून आपण आपल्या ( Hiv through tattoo ) शरीरावरती वेगवेगळ्या प्रकारचे टॅटू काढत असतो. परंतु, हे टॅटू काढत ( Hiv infection through tattoo making in up ) असताना आपल्याला तेवढ्याच ( tattoo hiv risk ) प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे. याचे कारण असे की, वाराणसीमध्ये टॅटू काढल्यामुळे तीन लोकांना एचआयव्ही ( HIV ) ची लागण झालेली आहे. त्यामुळे टॅटू काढताना कोणत्या ( Hiv in varanasi tattoo case ) गोष्टींची काळजी घ्यावी याबाबत तज्ज्ञांनी ( tattoo making tips to avoid hiv ) माहिती दिली.

Hiv through tattoo
टॅटूने एचआयव्ही

By

Published : Aug 10, 2022, 11:49 AM IST

Updated : Aug 10, 2022, 2:28 PM IST

पुणे - आवड म्हणून आपण आपल्या शरीरावरती ( Hiv through tattoo ) वेगवेगळ्या प्रकारचे टॅटू काढत असतो. परंतु, हे टॅटू काढत असताना आपल्याला तेवढ्याच ( Hiv infection through tattoo making in up ) प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे. याचे कारण असे की, वाराणसीमध्ये ( tattoo hiv risk ) टॅटू काढल्यामुळे तीन लोकांना एचआयव्ही ( HIV ) ची लागण झालेली आहे. टॅटूमुळे एचआव्हीची लागण होते का? किंवा टॅटू काढताना काय काळजी घेतली पाहिजे? काढणाऱ्याने काय काळजी घेतली पाहिजे आणि आपण काय काळजी ( Hiv in varanasi tattoo case ) घेतली पाहिजे याबाबत ( tattoo making tips to avoid hiv ) जाणून घेऊया.

माहिती देताना टॅटू व्यावसायिक आणि डॉक्टर

हेही वाचा -Devendra Fadnavis on Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, सरकारही मजबूत आहे- फडणवीस

एकासाठी वापरलेली निडल दुसऱ्यासाठी वापरू नये - साधारणपणे शरीरावर जेव्हा आपण टॅटू काढतो ते टॅटू अधिकृत अशा कलाकारांकडून आणि व्यावसायिकाकडून काढणे आवश्यक आहे. बहुतेक वेळा आपण टॅटू काढताना रस्त्यावर बसलेल्या लोकांकडून टॅटू काढतो. त्या ठिकाणी तेवढी काळजी न घेतल्यामुळे ते आपल्या जिवावर बेतू शकते. डॉक्टरांच्या मते टॅटू काढताना जी नीडल वापरली जाते ( hiv positive through tattoo making needle ) ती एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी वापरणे आवश्यक असते. एचआयव्हीचा संसर्ग हा रक्तामधून होतो, त्यामुळे त्याची काळजी घेतली पाहिजे. जर समजा एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीला लागलेली सुई दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरली तर आपल्या एचआयव्हीचे संक्रमण होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

ग्राहकांना त्रास होत नाही याची काळजी घेणे गरजेचे - एचआयव्हीचा संसर्ग हा वेगाने पसरू शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या संदर्भात 'ईटीवी भारत'शी डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी आपले मत व्यक्त केले. सुईमधून इतरत्र इन्फेक्शन झाल्याने अनेकांना तसा रोग होऊ शकतो, असे अविनाश भोंडवे म्हणाले. टॅटू व्यावसायिक सांगतात की, प्रथम आपण कुठल्या व्यावसायिकाकडे टॅटू काढतो हे पाहणे फार महत्त्वाचा आहे. टॅटू काढत असताना जी साधने वापरली ( tips to take care to avoid getting hiv positive ) जातात त्याची स्वच्छता असणे हेही फार महत्त्वाचा आहे. ग्राहकांना त्यातून कुठलीही शारीरिक हानी होत नाही ना याची काळजी घेणे आवश्यक आहे.

ही काळजी घेणे आवश्यक - टॅटू काढणाऱ्याने टॅटू काढताना पूर्ण ग्लोज काढले पाहिजेत, त्याचबरोबर जे निडल वापरतात ते नीडल एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी वापरली पाहिजे. परत ती दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरू नये. त्याचबरोबर त्यासाठी जे केमिकल वापरतात ते डी विटामिनचे असले पाहिजे. टॅटू काढत असताना शक्यतो जी इन्क आहे ती लगेच फेकून दिली पाहिजे. त्याचबरोबर टॅटू साठी लागणारी एक कॅप असते ती कॅप आणि निडल हे फार महत्त्वाचे असतात. याच्या मधून संक्रमण होऊ शकते.

या गोष्टी ध्यानात ठेवाव्या - ज्यावेळेस आपण शरीरावर टॅटू काढतो त्यावेळेस वापरण्यात येणार निडल नवीन आहे का? त्याची कॅप वापरतात ती आपल्यासाठीच आहे का? आणि इंक बॉटल आपल्यासमोरच ओपन केली आहे का याचा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर, आपण शक्यतो चांगल्या व्यावसायिकाकडून टॅटू काढून घ्यावेत, रस्त्यावरच्या नाही, कारण त्या ठिकाणी तेवढी काळजी घेतली जात नाही आणि आपला जीव धोक्यात जाऊ शकतो, असे डॉक्टर सांगतात.

हेही वाचा -Maharashtra TET Scam :...त्यामुळे आमदार अब्दुल सत्तारांच शिक्षणमंत्री करा; राष्ट्रवादीचे उपहासात्मक आंदोलन

Last Updated : Aug 10, 2022, 2:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details