पुणे - गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या युवकावा हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. सागर जानकी प्रसाद साहू (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळ उत्तरप्रदेश येथील राहिवासी आहे. पोलिसांनी आरोपीकडून २० हजार ५०० रुपयांचा गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे जप्त केले आहे.
गावठी कट्टा विकणाऱ्या उत्तरप्रदेशच्या युवकाला पोलिसांकडून अटक - राहिवासी
आरोपी सागर हा वाकड पुलाजवळील हॉटेल राजयोग येथे गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे विकण्यासाठी आला असल्याची माहितीं हिंजवडी पोलिसांना बातमीदारांमार्फत मिळाली होती.
आरोपी सागर हा वाकड पुलाजवळील हॉटेल राजयोग येथे गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे विकण्यासाठी आला असल्याची माहितीं हिंजवडी पोलिसांना बातमीदारांमार्फत मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी साध्या वेशात संबंधित हॉटेल भोवती सापळा रचला. आरोपीला संशय येणार नाही, याची काळजी घेऊन त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
मुळचा उत्तर प्रदेश येथील सागर हा सध्या चिंचवड येथे राहत आहे. त्याने विक्रीसाठी आणलेला गावठी कट्टा हा कोठून आणला याचा तपास हिंजवडी पोलीस करत आहेत. सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.