महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुसळधार पावसामुळे पुण्यातील रस्त्यांवर पाणीच-पाणी

रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहर परिसरात गेल्या 12 तासात 24 ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच 13 ठिकाणी झाडे पडलेली असून, एकूण अशा 37 घटनांची अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे नोंद झाली आहे.

पुण्यात रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झाले

By

Published : Sep 25, 2019, 11:41 AM IST

पुणे- रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहर परिसरात गेल्या 12 तासात 24 ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच 13 ठिकाणी झाडे पडलेली असून, एकूण अशा 37 घटनांची अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे नोंद झाली आहे.

पुण्यात रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झाले

येरवडा, कोंढवा, खडी मशीन चौक, नर्हे, भुमकर चौक, धनकवडी, मोहननगर, येरवडा, शांतीनगर, विश्रांतवाडी, बावधन, फातिमानगर, गोखलेनगर, पोलीस वसाहत या भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. तसेच हडपसर, सिझन मॉल, गुरवार पेठ, बाणेर,कळमकर वस्ती, भंडारी शोरुम, शिवाजीनगर, बिबवेवाडी, चिंतामणी नगर,इ. ते १३ ठिकाणी झाडे पडली आहेत.

हेही वाचा पुण्यात मुसळधार पाऊस, गारव्यामुळे पुणेकर सुखावले

शहर परिसरात मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली होती. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details