महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक! कारचालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरून 700 मीटर फरफटत नेले

वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मुंढवा सिग्नल चौकात खराडी बायपास रोड व साईनाथ नगर आणि झेन्सॉर कंपनी फाटा खराडी बायपास रोडवर घडली.

he Driver Snatched The Traffic Police From The Bonnet Of The Car At pune
धक्कादायक! कारचालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरून 700 मीटर फरफटत नेले

By

Published : Oct 17, 2021, 11:32 AM IST

Updated : Oct 17, 2021, 4:50 PM IST

पुणे -पूर्वीच्या थकलेले वाहतुक नियमभंगाच्या दंडाची 400 रुपयांची रक्कम भरण्यास सांगितल्याने एका कारचालकाने वाहतूक पोलीस हवालदाराच्या अंगावर गाडी घालून त्याला तब्बल 700 ते 800 मीटर फरफटत नेण्याचा धक्कादायक पुण्यात घडला आहे. याप्रकरणी पुण्यातील मुंढवा पोलिसांनी प्रशांत श्रीधर कांतावर (वय 43, रा. कन्हैया कॉम्प्लेक्स, महंमदवाडी, हडपसर) याला अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार शेषराव जायभाय (वय 43) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (गु. र. नं. २५३/२१) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रशांत कांतावर यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

घटनेची दृश्ये

700 ते 800 मीटर नेलं फरफटत -

ही घटना मुंढवा सिग्नल चौकात खराडी बायपास रोड व साईनाथ नगर आणि झेन्सॉर कंपनी फाटा खराडी बायपास रोडवर शुक्रवारी दुपारी सव्वाचार ते साडेचार दरम्यान घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक राजगुरु यांच्या देखरेखीखाली पोलीस हवालदार शेषराव जायभाय व त्यांचे सहकारी वाहनांवरील पूर्वीच्या ऑनलाईन खटल्यांची दंडाची रक्कम कारवाई करत होते .त्यावेळी प्रशांत कांतावर हा कार घेऊन चौकात आला. तेव्हा जायभाय यांनी गाडीवर पूर्वीचा 400 रुपयांचा दंड आहे. तो भरण्यास सांगितले. तेव्हा त्याने गाडीचा हॉर्न वाजवित दंडाची रक्कम न भरता त जायभाय यांच्या अंगावर जीवे मारण्याच्या हेतूने गाडी घातली आणि त्यांना फरफटत 700 ते 800 मीटर नेलं.

यापूर्वी आशा घटना घडल्या आहेत. अंधेरी येथील डीए.एन.नगर परिसरात कार चालकाने एका वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेल्याची घटना घडली होती. कार नो एंट्रीत आल्याचे पाहून वाहतूक पोलिसांने कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र कार चालकाने कार थांबवली नाही. नो एंट्रीमध्ये घुसणाऱ्या कार चालकाने गाडी न थांबविल्याने वाहूतक पोलिसाने गाडीच्या बोनेटवर उडी घेतली. त्यानंतर कार चालकाने न खांबवता त्यांना आझाद मैदान येथून गणेश चौकापर्यंत वाहतूक पोलिसाला फरफटत नेले.

हेही वाचा -आरोग्य विभागाच्या भरतीत पुन्हा गोंधळ, सकाळी एका तर दुपारी दुसऱ्या जिल्ह्यातील परिक्षा केंद्र

Last Updated : Oct 17, 2021, 4:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details